कोरोनातून बरे झालेले ठरताहेत मानसिक आजाराचे  शिकार 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

कोरोनातून बऱ्या झालेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये असे बदल दिसत असतील तर आताच सावध व्हा,  जर असे होत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.

कुटुंबातील सदस्य  कोरोनातून  बरा  झाल्यानंतर सर्वानाच प्रचंड आनंद होतो. आपल्या माणसाची  कोरोनातुन सुटका होण्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करत असतो.  मात्र तुमच्या कुटुंबातील सदस्य कोरोनातून (COVID-19)  मुक्त झाल्यानंतर खूप नकारात्मक  (negative) झाला आहे का, कधी कधी तो किंवा ती  अचानक दुःखी  होतो का, किंवा अचानक आनंदी दिसतो का? किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे किंवा अगदी  थोड्याश्या गोष्टींवरून घाबरून जाणे, असे बदल तुम्हाला दिसत आहेत का, कोरोनातून बऱ्या झालेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये असे बदल दिसत असतील तर आताच सावध व्हा,  जर असे होत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.  (Coronas are considered to be the victims of mental illness) 

सावधान! कोरोनानंतर आता होऊ शकतो बुरशीजन्य संसर्ग

कोरोनाततून  बऱ्या झालेल्या व्यक्ती असे वर्तन करत असतील तर  त्यांच्याकडे दुर्लक्ष करू  नका. याचे कारण म्हणजे  कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे हा  एखाद्या प्रकारच्या मानसिक आजार असू शकतो. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासातून काही धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत. अमेरिकेत कोरोनातुन बरे झालेल्या रूग्णांविषयी केलेल्या अभ्यासानंतरच्या निष्कर्षांमुळे बीएचयू मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ देखील आश्चर्यचकित झाले  आहेत. संसर्गाच्या वेळी जर रुग्णाला जास्त ताणतणावाचा त्रास होत असेल तर त्याला अशा समस्या उद्भवू शकतात. जर त्याला रूग्णालयात दाखल करावे लागले तर त्याची भीती आणखी वाढते, असे  बीएचयूच्या सामाजिक विज्ञान विद्याशाखांच्या मानसशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. एचएस अस्थाना यांनी म्हटले आहे. 

12 ते 15 वर्षाच्या मुलांना मिळणार अमेरिकेची फायजर लस

या अभ्यासानुसार, कोरोनामधून बरे झालेले सहा हजार रुग्ण वेगवेगळ्या वर्गात विभागले गेले होते. यात  आधीच निरोगी व्यक्तींपैकी 15 टक्के व्यक्तीमध्ये संसर्गानंतर मानसिक आजाराची चिन्हे  दिसण्यास  सुरुवात झाली होती. मधुमेह आणि रक्तदाब अशा आजारांसाठी आधीच औषधे घेत असलेल्यांपैकी 45 टक्के लोकांमध्ये नैराश्याचे लक्षण स्पष्टपणे दिसून आले.  तर उर्वरित 40  टक्के लोक जे  हृदय आणि  पोटाच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे, त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हेमोरेज यासारख्या गंभीर आजारांची लक्षणे दिसत होती. 

कोरोनामुळे चौदा प्रकारच्या मानसिक रोगांची शक्यता 
बीएचयू मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ता यांच्या मते, कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे लोकांमध्ये 14 प्रकारचे मानसिक विकार असू शकतात. यापैकी चीड, चिंता, मत्सर, मनःस्थिती बदलणे, मेंदू रक्तस्राव, वेड. असे काही विकार आहेत. याबाबत  मानसशास्त्रज्ञांनी या सूचना दिल्या आहेत. 

- मानसशास्त्रज्ञांना रुग्णाच्या लक्षणांबद्दल सांगा.
- अशा लक्षणांनाचा रुग्ण जागा असेलतर त्यांना एकटे सोडू नका 
- त्याच्या खोलीच्या सजावटीमध्ये हिरव्या रंगास प्राधान्य द्या.
- त्यांना  प्रेरणादायक कथा सांगा किंवा वाचनाला प्रेरणा द्या.
- त्यांची  प्रत्येक गोष्ट गंभीरपणे ऐका.
- त्यांचा आवडता पदार्थ बनवा.
- त्यांच्या आवडीच्या कामात सहभागी  व्हा.
- नकारात्मक माहितीपासून त्यांना  दूर ठेवा.
- झोपेच्या वेळी त्याच्या श्वासाच्या वेगावर लक्ष ठेवा.
-सकाळी उठल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचे पेय द्या 

संबंधित बातम्या