Sri Lanka: 'बुडत्याचा पाय खोलात', आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत वाढली डेंग्यू रुग्णांची संख्या

Sri Lanka Crisis News: श्रीलंका सध्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak

Sri Lanka Crisis: श्रीलंका सध्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अलीकडेच श्रीलंकेत लोक राज्यकर्त्यांविरुध्द रस्त्यावर उतरले. श्रीलंकेतील या राजकीय आणि आर्थिक संकटाला राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचे श्रीलंकन नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या तीव्र निषेधानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडावा लागला.

दरम्यान, देशातील राजकीय परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनले. यातच आता श्रीलंकेत आणखी एका समस्येने दस्तक दिली आहे. श्रीलंकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना आणि डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चेतावणी जारी केली आहे. श्रीलंकेच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालण्याचे, कोवीड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आणि वारंवार हात धुण्यासह कोविड-19 शी संबंधित इतर प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Sri Lanka
Sri Lanka Crisis: 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यकता

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत

श्रीलंकेचे आरोग्य सचिव जनक चंद्रगुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना (Corona) रुग्णांमध्ये वाढ होत असताना, जनतेला आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 2020 च्या सुरुवातीला सरकारने मास्क घालणे अनिवार्य केले होते. तथापि, सुमारे 15 दशलक्ष लोकांच्या संपूर्ण लसीकरणानंतर (Vaccination), जे एकूण लोकसंख्येच्या 66 टक्क्यांहून अधिक आहे, 10 जून रोजी मास्क सक्ती हटवण्यात आली.

Sri Lanka
Sri Lanka Crisis: दिनेश गुणवर्धना बनले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

डेंग्यूची साथही एक समस्या बनली आहे

दुसरीकडे, कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच, डेंग्यू महामारीचा देखील श्रीलंकेत (Sri Lanka) वेगाने प्रसार होत आहे. आरोग्य मंत्रालयाचे संचालक डॉ हमदानी अन्वर यांनी सांगितले की, 'कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येव्यतिरिक्त डेंग्यू रुग्णांची देखील संख्या वाढत आहे.'

Sri Lanka
Sri Lanka आर्थिक अन् राजकीय संकटातून सावरला नाही? अमेरिकन अधिकाऱ्याने दिले उत्तर

श्रीलंकेत डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळले आहेत

नॅशनल डेंग्यू कंट्रोल युनिटचे संचालक सुदाता समरवीरा यांनी सांगितले की, 'जानेवारीपासून 44,000 हून अधिक डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 8,200 एकट्या जुलैमध्ये नोंदवले गेले आहेत.' ते पुढे म्हणाले, 'डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून देशात साथीची गंभीर स्थिती आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com