Coronavirus: सुंदर पिचाईंनी केली मोठी घोषणा; गुगल करणार भारताला मदत

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

भारतातील कोरोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहता मला धक्का बसला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून रोज लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच जगभरातून भारताकडे (India) मदतीचा ओघ सुरु झालाय. अनेक देशांनी पुढे येत भारताला मदत करण्यासंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. असं असतानाच माहिती तंत्रज्ञानातील क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या गुगलने (Google) भारतासाठी 135 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. तसेच भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. (Coronavirus Big announcement made by beautiful Pichai Google will help India)

‘’भारतातील कोरोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहता मला धक्का बसला आहे. गुगल आणि गुगलमधील सगळेजण भारताला 135 कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या (UNICFF) माध्यामातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे,’’ असं सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं आहे.

धक्कादायक!  चीनच्या वूहान लॅबमध्ये होतेय अनेक प्राणघातक विषाणूंची उत्पत्ती: पण...

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी पुढे येत भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये अमेरिका (America), ब्रिटन (Briten), सौदी अरेबिया (Saudi Arabia), ऑस्ट्रेलिया (Australia) यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भात आश्वासन दिलं आहे. मागील अनेके आठवड्य़ांपासून लस निर्मितीसाठी लागणारा कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरिकेने भारताला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ब्रिटननं देखील भारताला कोरोनाविरुध्दच्या लढाईमध्ये मदत करण्याचं आश्वासन भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान आणि मोठ्या देशांनी भारताला कोरोनाविरुध्द लढाईत मदत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. 
 

संबंधित बातम्या