कोरोनामुळे दक्षिण आशियातील महिला दारिद्र्याच्या

पीटीआय
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे दक्षिण आशियातील महिलांमधील दारिद्र्याचा दर पुढील वर्षी वाढणार आहे. पुढील दशकात २५ ते ३४ या वयोगटातील महिला पुरुषांपेक्षा जास्त गरीब असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात व्यक्त केला. हा अहवाल काल प्रसिद्ध झाला आहे.

न्यूयॉर्क: कोरोनामुळे दक्षिण आशियातील महिलांमधील दारिद्र्याचा दर पुढील वर्षी वाढणार आहे. पुढील दशकात २५ ते ३४ या वयोगटातील महिला पुरुषांपेक्षा जास्त गरीब असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात व्यक्त केला. हा अहवाल काल प्रसिद्ध झाला आहे.

‘यूएन महिला व यूएन विकास कार्यक्रम’ (यूएनडीपी)ने म्हटले आहे की, कोरोनाच्या जागतिक साथीमुळे महिलांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. २०२१ पर्यंत चार कोटी ७० लाख महिला व मुली दारिद्र्याच्या गर्तेत लोटल्या जातील. या गटाला दारिद्र्यरेषेवर आणून प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी अनेक दशके लागली. पण कोरोनामुळे याच्या उलट परिणाम होणार आहे. ‘फ्रॉम इनसाईट्स टू ॲक्शन ः जंडर इक्वालिटी इन द वेक ऑफ कोविड- १९’  अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियात स्त्री-पुरुषांमधील गरिबीची दरी आणखी वाढणार आहे. मध्य, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या सहारा उपभागात जगातील ८७ टक्के सर्वांत गरीब लोक राहतात.  

संबंधित बातम्या