Coronavirus: ‘’त्वरित भारत सोडा’’ अमेरिकेचा नागरिकांना संदेश

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

अमेरिकेने आपल्या नागरिकांना त्वरित मायदेशी परतण्यास सांगितलं आहे. 

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज लाखोच्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन (Oxgen), रेमडिसिव्हीर(Remdisivir) अशा अनेक गोष्टींची भारताला (India) कमतरता भासत आहे. अमेरिका (America), रशियासंह (Rashia) जगभरातील अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणही कठीणं झालं असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना त्वरित मायदेशी परतण्यास सांगितलं आहे.(Coronavirus Leave India now message to US citizens)

बायडन सरकारनं (Biden Goverment) आपल्या नागरिकांना कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे. अमेरिका सरकारकडून यासंबंधीची अ‍ॅडव्हाजरी प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये नागरिकांनी भारतात जाऊ नये किंवा भारतात असाल तर लवकरात लवकर भारत सोडण्याचे सांगण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं अमेरिका सरकारडून सांगण्यात आलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या 14 प्रवासी विमाने सुरु आहेत. यामध्ये युरोपातून जोडली जाणारी सेवाही आहे.

कधी-कोणता मास्क वापरावा? 'या' आहेत  जागतिक आरोग्य संघटनेच्या...

भारतात कोरोनाचं संकट भयावह परिस्थिती धारण करत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. भारतात वेगाने कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत असून गेल्या चोवीस तासामध्ये 3 लाख 79 हजार 257 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

याआगोदर ऑस्ट्रोलियानं (Austrila) भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. यामुळे भारतातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरणात ठेवताना आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होणार आहे. रुग्णसंख्या वाढल्यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटननेही (Briten) 10 दिवसांच्या कालावधीत भारतात असणाऱ्या ब्रिटीश नागरिकांना देशात नाकारलं आहे. भारतातून ब्रिटीश नागरिकांना हॉटेलमध्ये होमक्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे.   
 

संबंधित बातम्या