Coronavirus: भारतातील चिंताजनक स्थितीवर पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले...

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

कोरोना महामारीमुळे पीडीत शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो.

देशात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय उपकरणे, लिक्विड ऑक्सिजन याची उणीव भासत आहे. तसेच झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. रुग्णालयांच्या बाहेर कोरोना रुग्णांच्या रांगा लागत आहेत. अनेकांना रुग्णालयामध्ये बेडही मिळत नाही. तसेच अनेकांना डॉक्टरांच्या उपचाराअभावी जीव सोडावा लागत आहे. या दरम्यान पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी भारताला धीर देणारं ट्विट केलं आहे. (Coronavirus Pakistani PM on worrisome situation in India) 

'कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या भारतातील (India) नागरिकांच्या संवेदना आम्ही समजू शकतो. या कोरोना महामारीमुळे पीडीत शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते लवकर बरे व्हावेत. माणुसकीच्या (Humanity) नात्याने सगळ्यांनी मिळून या कोरोना महामारीला तोंड देणं आवश्यक आहे, असं ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.

पाकिस्तानच्या एधी संस्थेनं भारताला दिला मदतीचा हात

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Corona Second Wave) सामना करण्यासाठी आम्ही भारतींयाबरोबर आहोत. आम्ही पाकिस्तानच्या जनतेकडून कोरोना पिडीत कुटुंबियासाठी प्रार्थना करतो. या कोरोना संकटात मानवतेची विचारधारा आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून या कोरोना संकटाचा सामना केला पाहिजे. पाकिस्तान सार्क देशांबरोबर एकत्र येऊन या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी कार्य सुरुचं ठेवणार आहे, असं ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केलं आहे. 

भारतातील कोरोना संकटाची गंभीर परिस्थिती पाहता पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील प्रसिध्द सेवाभावी संस्था एधी फाऊंडेशनने (Edhi Foundation) भारताला 50 रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केलीय. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्यांनी पत्र लिहलं आहे. पाकिस्तानमध्ये एधीने घेतलेल्या पुढाकारासाठी संस्थेचं कौतुक केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास एक दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर 2015 साली भारतात परतलेली मूकी आणि बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमधील एधी फाऊंडेशनचे केली होती. भारतामध्ये गीता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा संभाळ करणाऱ्या एधी फाऊंडेशनला एक कोटी रुपांयाची मदत जाहीर केली होती.
 

संबंधित बातम्या