काबूलला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी देश सोडावा लागला: अशरफ घनी

काबूल सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी एका सल्लागाराने मला फक्त काही मिनिटे दिली.
Country had to be abandoned to save Kabul from ruin: Ashraf Ghani

Country had to be abandoned to save Kabul from ruin: Ashraf Ghani

Dainik Gomantak

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी सांगितले की, तालिबानी लढवय्यांकडून काबूलला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना देश सोडावा लागला. देश सोडल्यानंतर चार महिन्यांनी पहिल्या मुलाखतीत त्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. माजी राष्ट्रपती घनी (Ashraf Ghani) म्हणाले, 'देश सोडणे हा माझ्यासाठी कठीण निर्णय होता. काबूल सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी एका सल्लागाराने मला फक्त काही मिनिटे दिली.

हेलिकॉप्टरमध्ये चढल्यानंतर माझा देशातला हा शेवटचा दिवस होता यावर विश्वास बसत नव्हता. तालिबानचा प्रभाव इतका वाढला होता की सुरक्षा दल मला जास्त काळ संरक्षण देऊ शकले नाहीत. तालिबान (Taliban) दोन बाजूंनी आमच्या दिशेने सरकत होते. माझे रक्षण करणारे लोकही तालिबानपासून सुटू शकणार नाहीत हे मला समजले होते. अशा स्थितीत काबूलमध्ये मोठा विध्वंस झाला असता. 50 लाख लोकसंख्या असलेले शहर उद्ध्वस्त झाले असते.

<div class="paragraphs"><p>Country had to be abandoned to save Kabul from ruin: Ashraf Ghani</p></div>
तालिबान्यांशी मैत्री करणं चीनला पडलं महाग, ड्रॅगनने 'या' मुद्यांवर व्यक्त केली चिंता

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष घनी यांचा भ्रष्टाच्या यादीत समावेश

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने यावर्षी 2021 च्या भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचाही समावेश करण्यात आला आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे जगातील सर्वात भ्रष्ट लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन आणि ऑस्ट्रेलियाचे चांसलर सेबॅस्टियन कुर्झ यांचाही समावेश आहे

ओसीसीआरपीच्या म्हणण्यानुसार, अशरफ गनीने आपल्या लोकांना दुःखी आणि उपाशी मरून सोडले होते. जेणेकरून तो यूएईमध्ये आपल्यासारख्या इतर भ्रष्ट साथीदारांसोबत शांततेत राहू शकेल. संस्थेचे सह-संस्थापक ड्र्यू सुलिव्हन म्हणाले की, सहा पत्रकार आणि अभ्यासकांच्या एका पॅनेलला घनी "भ्रष्टाचारात बुडलेले" असल्याचे आढळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com