दोनपेक्षा अधिक अपत्य असल्य़ामुळे ''या'' देशात दांपत्याला एक कोटीचा दंड    

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्य़ामुळे ''या'' देशात दांपत्याला एक कोटीचा दंड    
Couples fined Rs 1 crore in Ya country for having more than two children

बीजिंग: चीनमधील वन चाइल्ड पॉलिसीमुळे जन्मदरात आधीच मोठ्याप्रमाणात घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनमधील एका जोडप्याला राष्ट्रीय स्तरावरील दोन आपत्याच्या निकषांचे उल्लंघन केल्य़ामुळे तब्बल एक कोटीचा दंड ठोठावण्य़ात आला आहे. या दापंत्याने दोन अपत्याच्या धोरणाचा भंग केला. दांपत्याने तब्बल सात बालकांना जन्म दिला आहे. म्हणून त्यांच्यावर आकारलेला दंड सामाजिक सहकार्य निधी म्हणून भरावा लागला आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या दापंत्याने तब्बल सात बालकांना जन्म दिल्याप्रकरणी त्यांना एक कोटी रुपयांहून अधिक निधी जमा करण्याचा आदेश चीन सरकारने दिला आहे. जहांग रोंगरोंग यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. चीनमधील सरकारी नियमांना तिलांजली दिल्याप्रकरणी या दांपत्याने ठोठावण्यात आलेली रक्कम जमा केली आहे. दांपत्याने ही दंडाची रक्कम दिली नसती तर पहिली दोन मुलं वगळता इतर पाच मुलांना कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी आणि सरकारी कागदपत्रे देण्यात आली नसती.    
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com