संसर्ग हेच जीवनाचे वास्तव

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कोरोनाविरोधातील लस अंतिम टप्प्यात येत असल्याने आशा वाढली असली तरी ती अद्यापही बाजारात आलेली नाही आणि कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

न्यूयॉर्क: कोरोनाविरोधातील लस अंतिम टप्प्यात येत असल्याने आशा वाढली असली तरी ती अद्यापही बाजारात आलेली नाही आणि कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही वारंवार हेच सांगत लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलेला आहे. आजही आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रॉस अधनॉम घेब्रेयेसस यांनी, संसर्ग हेच जीवनाचे वास्तव असून जगातील लोकांनी भविष्यातील संसर्गाच्या लाटांना सामोरे जाण्यासाठी तयारी करावी, असा इशारा दिला आहे. जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी भारतासह काही देशांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचाही उच्चांक होत आहे. जगभरात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटी ७१ लाखांच्या पुढे गेली असून त्यापैकी १ कोटी ८१ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.

संबंधित बातम्या