COVID-19: हे 'चमत्कारिक औषध' तुम्हाला कोरोनापासून वाचवणार:एनएसएच

'जीवनरक्षक' चमत्कारिक औषधाची सामान्य चिकित्सक आणि संसद सदस्यांनी प्रशंसा केल्याची बातमी ब्रिटनमधून (Britain) आली आहे.
British people
British peopleDainik Goamantak

संपूर्ण जग सध्या कोरोना (Covid19) विषाणूच्या साथीशी लढत आहे. बहुतेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अजून चिंता वाढविली आहे. हेच कारण आहे की, शास्त्रज्ञ विषाणूचा सामना करण्यासाठी सतत नवीन अभ्यास (Study on Coronavirus Treatment) करत आहेत. कोविडच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 'जीवनरक्षक' चमत्कारिक औषधाची सामान्य चिकित्सक आणि संसद सदस्यांनी प्रशंसा केल्याची बातमी ब्रिटनमधून आली आहे.

डेलीमेलमधील एका अहवालानुसार, कोविड रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यापासून वाचवण्यासाठी स्टेरॉइड डेक्सामेथासोन (Dexamethasone) देण्यात येऊ लागली आहे. ब्रिटनच्या खासदारांनी आरोग्य सेवेशी निगडित असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले की, आजारी रुग्णांना त्यांच्या घरी ही औषधे पुरविण्यात यावीत, जेणेकरून कोविडची प्रकरणे कमी होऊ शकतील (कोरोनाव्हायरस उपचारांवरील नवीनतम अभ्यास). फुफ्फुसांचे नुकसान कमी करण्यासाठी बहुतेक रुग्णालयांमध्ये स्टिरॉइड्सचा वापर केला जात आहे. यामुळे रुग्णांनाही कमी व्हेंटिलेटरची गरज असते.

British people
कोरोनाचे 'सुपर म्युटंट व्हेरिएंट' येऊ शकतो, ब्रिटिश शास्त्रज्ञांचा इशारा

हजारो जीव वाचवले

एनएसएच इंग्लंडने या वर्षी केलेल्या अभ्यासात असे निरिक्षण नोंदवले गेले की, यूकेमध्ये स्टेरॉईड्सने 22,000 आणि जगभरात लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत. रुग्णांना या औषधाचा सल्ला देणारे डॉक्टर म्हणतात, 'हे जीव वाचवत आहे. हे काम करत आहे आणि हे ठीक आहे आम्ही लोकांना ते घेण्यास सांगत आहोत जेणेकरून त्यांची स्थिती गंभीर होणार नाही.'' कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार नील ओब्रायन डेक्सामेथासोनच्या वापरावर म्हणाले की, हा एक खूप मोठा विजय आहे. ते पुढे म्हणाले की, हे उपचाराचे यश आहे "साथीच्या आजारावर काम करण्यासाठी ब्रिटिश योगदानांपैकी एक आहे." जे स्वस्त आहे आणि काम देखील करते.

British people
Vaccine न घेतल्यास घातक ठरू शकतो डेल्टा व्हेरिएंट

ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अभ्यास

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने 2,000 पेक्षा जास्त कोविड रुग्णांचा अभ्यास करण्यात आला, ज्यांना हे औषध देण्यात आले होते. औषधाच्या वापरामुळे ऑक्सिजन (Britain Steroid Covid-19 Drug) ची गरज असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कमी झाला आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोकाही कमी झाला. साऊथ सफोकचे खासदार जेम्स कार्टलेज यांनी याचे कौतुक केले आणि सांगितले की सरकारने त्यासाठी सहाय्य देणे सुरू ठेवले पाहिजे. येथील NHS रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोनचा वापर केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com