Covid 19: कोरोना लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं... डॉ. अँथनी फाउची

अमेरिकेच्या White House मुख्य आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथनी फाउची यांचे मत (Covid 19)
Covid 19: कोरोना लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं... डॉ. अँथनी फाउची
Covid 19Dainik Gomantak

Covid 19: कोरोनावरील लसीचा तिसरा डोस (Covid 3rd Dose) घेणं आता गरजेचं आहे, असे अमेरिकेच्या White House मुख्य आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथनी फाउची (Dr Anthony Fauci) यांनी व्यक्त केलं आहे. दोन डोस घेतले तरीसुद्धा काही महिन्यांनी लसीची कार्यक्षमता मंदावून लसीचा (Covid Vaccine) प्रभाव कमी होतो त्यामुळे अश्या परिस्थितीत कोविड संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तिसरा प्रभावी डोस घेतला तर कोविड संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो, अशी आकडेवारी डॉ. फाउची यांनी सादर केली. यासाठी त्यांनी इस्रायलमध्ये (Israel) तिसऱ्या डोस दिल्यानंतर मिळणाऱ्या संरक्षणाचे दाखलेही दिले. त्यामुळे कोविड लसीचे दोन ऐवजी तीन डोस घेणं, हे गरजेचं होईल, कारण तशीच गरज असल्याचे डॉ. फाउची म्हणाले.

Covid 19
'तुम्ही कर भरावा, जेणेकरुन देश चालेल': इम्रान खान

अमेरिकेतील नागरिकांना येत्या काही दिवसात तिसरा डोस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याबाबतचे व्यवस्थापन देखील पूर्ण झाल्याचे फाउची म्हणाले. फायझर तसेच मॉडर्ना लसीचा तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर आठ महिन्यांनी तिसरा डोस द्यावा लागणार. याबाद्दल निर्णय हा तेथील एफडीए लवकरच घेणार आहे. अमेरिकेतील जवळपास ४ कोटी नागरिकांना आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर साधारणतः साडेसहा लाख लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. गेल्या महिन्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आणि मुलांमध्ये संसर्ग वाढू लागल्याने अमेरिकेत चिंतेच वातावरण पसरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे अमेरिकेत आतापर्यंत 36 कोटी 73 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं आहे. सुमारे 17 कोटींपेक्षा जास्त लोकांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com