तुर्कस्तानातील क्रिप्टोकरन्सी दिवाळखोरीत!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

तुर्की पोलिसांनी इस्तंबूलमधील थोडेक्स कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता.

तुर्केस्तानमध्ये (Turestan) क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) एक्सचेंज म्हणून प्रसिध्द असलेल्या थोडेक्स कंपनीचा (Torex Company) संस्थापक देश सोडून पळून गेल्याने अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यामध्ये बिटकॉईनमधील घसरणीमुळे तुर्कीच्या केंद्रीय बॅंकेनं देशात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून खरेदीवर बंदी घातली आहे. या निर्णयांनतर गुंतवणूकदारांमध्य़े भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर तुर्की पोलिसांनी इस्तंबूलमधील थोडेक्स कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता. मात्र 27 वर्षीय संस्थापक फारुख फातिह ओझर (Faruq Fatiha Ozar)  हा देश फरार झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. तुर्की सरकारने कंपनीची सर्व खाती सील केली आहेत.(Cryptocurrency bankruptcy in Turkey)

Oxgen Shortage: चीनने पुढे केला मदतीचा हात; भारताने मात्र...

तुर्कस्तानमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, 2 बिलियन डॉलर्सचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. तर पिडितांच्या वकिलांनी 3, 90,000 गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या वेबसाईटनं 30 हजार गुंतवणूकदारांना फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये किती गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती आणि त्याचा किती परिणाम झाला आहे, याबाबत अजूनही संभ्रम आहे.

दुसरीकडे, थोडेक्सचा संस्थापक फारुख फातिह ओझर यांने गुंतवणूकादांराना पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परतफेड केल्यानंतरच देशामध्ये परतेन आणि न्यायालयासमोर जाईल असं त्याने सांगितले आहे. त्याच्या या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न गुंतवणूदारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना पैसे बुडाल्याची जाणीव झाली आहे.
 

संबंधित बातम्या