डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना मिळणार अर्थशास्त्रातील नोबेल
David Card & Joshua de Angrist & Guido W. ImbensTwitter/ @ANI

डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना मिळणार अर्थशास्त्रातील नोबेल

नॉर्वेजियन नोबेल समितीने (Norwegian Nobel Committee) सोमवारी याची घोषणा केली.

2021 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड कार्ड (David Card) आणि संयुक्तपणे जोशुआ डी अँग्रिस्ट (Joshua de Angrist) आणि गिडो डब्ल्यू इम्बेन्स (Guido W. Imbens) यांना दिला जाईल. नॉर्वेजियन नोबेल समितीने सोमवारी याची घोषणा केली. रोजगारासारख्या महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवरील संशोधनासाठी तीन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांची 2021 च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्रम बाजार आणि नॅच्युरअल एक्सपेरिमेंट्स क्षेत्रात त्यांच्या स्तुत्य योगदानासाठी या तिघांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

लेबर इकोनामिक्स (Labor Economics) योगदानासाठी कॅनेडियन वंशाच्या डेव्हिड कार्डला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इस्रायली-अमेरिकन जोशुआ डी'अँग्रिस्ट आणि डच-अमेरिकन गाइडो डब्ल्यू एम्ब्रान्स यांनी लेबर मार्केट आणि नॅच्युरअल एक्सपेरिमेंट्सचे विश्लेषण केले आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराला अधिकृतपणे Sveriges Riksbank Prize असे म्हणतात. याची सुरुवात 1968 मध्ये झाली. नोबेल पुरस्कारामध्ये अर्थशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे.

David Card & Joshua de Angrist & Guido W. Imbens
मारिया रेस्‍सा आणि दमित्रि मुराटोव यांना 2021चा शांततेचा नोबेल जाहीर

यापूर्वी वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलसाठी अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस आणि एर्डम पटापौटियन यांची यावेळी निवड झाली आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जपानचे सौकुरो मनाबे, जर्मनीचे क्लास हेसलमन आणि इटलीचे जॉर्जियो पॅरीसी यांना देण्यात येईल.

Related Stories

No stories found.