मेडिसीन क्षेत्रात डेविड जूलियस आणि आर्डेम पॅटपौटियनना नोबेल जाहीर

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Nobel Prize) दोन्ही शास्रज्ञाना संयुक्तपणे देण्यात आले आहे.
मेडिसीन क्षेत्रात डेविड जूलियस आणि आर्डेम पॅटपौटियनना नोबेल जाहीर
Nobel PrizeDainik Gomantak

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या नोबेल पुरस्काराची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. डेव्हिड ज्युलियस (David Julius) आणि आर्डेम पटापौटियन (Ardem Patapoutian) यांनी तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्स शोधल्याबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021(Physiology or Medicine Nobel Prize) जाहीर झाले आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन्ही शास्रज्ञाना संयुक्तपणे देण्यात आले आहे. 2021 नोबेल पारितोषिकांपैकी पहिल्या पुरस्काराची घोषणा झाली आहे. (2021 Nobel Prize)

स्टॉकहोममधील (Stockholm) कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील (Karolinska Institute) पॅनेलद्वारे पुरस्काराची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी वैद्यकशास्त्रात हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला होता. या शास्त्रज्ञांनी हेपेटाइटिस सी वायरस (Hepatitis C virus) शोधला जो यकृताला हानी पोहोचवतो. ही एक अशी प्रगती होती, ज्यामुळे या प्राणघातक आजारावर उपचार करणे सोपे झाले आणि रक्तपेढ्यांद्वारे (Blood Banks) या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी चाचण्या घेण्यात येऊ लागल्या. नोबेल पारितोषिक अनेक श्रेणींमध्ये दिले जाते.

Nobel Prize
फुमिओ किशिदा बनले जपानचे नवे पंतप्रधान

मानवजातीला लाभलेल्या शोधासाठी त्या श्रेणीमध्ये बक्षीस दिले जाते

प्रतिष्ठित पुरस्कारासाठीच्या नामांकनांविषयी माहिती देताना, कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटचे शरीरशास्त्राचे प्राध्यापक आणि नोबेल असेंब्लीचे सदस्य ज्युलियन गेराथ म्हणाले की , "शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिकांचे निकष तयार करताना अल्फ्रेड नोबेल आपल्या मतांविषयी अगदी स्पष्ट होते. विशेषतः त्यांनी पुढे सांगितले की, मानवजातीला दिर्घकालीन फायदा होईल असे शोध लावण्यात आले पाहिजे. म्हणून आमचे निकष खूपच संकिर्ण आहेत.

Nobel Prize
जपानचे मुत्सद्दी राजकारणी फुमियो किशिदा होणार देशाचे पुढील पंतप्रधान

बक्षीस जिंकल्यानंतर ही रक्कम दिली जाते

प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारात सुवर्णपदक दिले जाते. तसेच, एक कोटी स्वीडिश क्रोनर दिले जातात. जे भारतीय चलनात 8.50 कोटी रुपये. 1895 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले. त्याचबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या आठवड्यात या क्षेत्रांसाठी पुरस्कार जाहीर केले जातील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com