Pakistan: 'धक्कादायक' अज्ञातांनी मृत मुलीवर केला बलात्कार, 17 आरोपींची चौकशी सुरु

अताउल्ला तरार यांनी 6 मे रोजी ट्विट करुन माहिती दिली की, 17 संशयितांची चौकशी केली जात आहे.
Grave
GraveDainik Gomantak

पाकिस्तानातील गुजरातमधील चक कमला गावात 5 मे रोजी गुरुवारी, काही अज्ञात व्यक्तींनी एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह खोदून तिच्यावर बलात्कार केला. पाकिस्तान मुस्लिम लीग (PMLN) चे उप महासचिव अताउल्ला तरार यांनी 6 मे रोजी ट्विट करुन माहिती दिली की, 17 संशयितांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास वैज्ञानिक पद्धतींनुसार सुरु आहे.(dead girl sexually Assualted by Unidentified persons interrogation of 17 accused)

वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी मृत मुलीचे नातेवाईक त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार स्मशानात गेले तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतदेह खोदलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळून आला. शरीरावर बलात्काराच्या खुणाही दिसून आल्या. दुसरीकडे, मृत मुलीच्या काकांनी पोलिसात जाऊन एफआयआर दाखल केला. एफआयआरच्या आधारे पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या धक्कादायक घटनेत किती पुरुष सहभागी होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Grave
Pakistan Politics: ''काका पुरे आता'', पंतप्रधान शरीफ यांच्यावर मरियम नवाझ 'खफा'

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या किशोरवयीन मृत मुलीचा 4 मे, बुधवारी मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास कुटुंबीय धार्मिक परंपरेनुसार स्मशानभूमीत तिचे दफन करुन घरी परतले. दुसऱ्या दिवशी, जेव्हा ते मुलीच्या मृतदेहावर काही विधी करण्यासाठी स्मशानात परतले तेव्हा नातेवाईकांना कबर खोदलेली आढळली आणि मुलीचा मृतदेह गायब होता. शोध घेतल्यानंतर त्यांना स्मशानभूमीपासून सुमारे 200 चौरस फूट अंतरावर मृतदेह पडलेला आढळून आला. त्यात बलात्काराच्या खुणा दिसून आल्या.

दरम्यान, कुटुंबींयांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या जघन्य गुन्ह्यातील दोषींना तात्काळ शिक्षेची मागणी केली. पोलिसांनी, उलट कबर खोदणाऱ्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी त्यांचा शोध सुरु केला.

Grave
Pakistan: राष्ट्रपतींनी घेतली अचानक सुट्टी, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी ढकलला पुढे

तसेच, पाकिस्तानातील (Pakistan) अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. 2021 मध्ये, काही अज्ञात व्यक्तींनी गुलामुल्ला शहराजवळील मौलवी अश्रफ चंडियो गावात असेच धक्कादायक कृत्य केले होते. 2019 मध्ये OpIndia ने देखील अशाच गुन्ह्याची नोंद केली होती, ज्यात अज्ञात पुरुषांच्या एका गटाने कराचीच्या लांधी टाउन भागातील स्मशानभूमीत एका महिलेची कबर खोदून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.

याशिवाय, 2011 मध्ये उत्तर नाझिमाबाद, कराची येथील मुहम्मद रिजवान नावाच्या कबरीपालाला नेक्रोफिलियासाठी अटक करण्यात आली होती. 48 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मृतदेहाची विटंबना करुन पळताना रिझवानला पकडण्यात आले. त्याने आजूबाजूचे कबर खोदणारे आणि इतर काही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com