धक्कादायक! जपानमध्ये सापडला कोरोना विषाणूचा घातक प्रकार

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

कोरोना विषाणूचा प्रकार बदलत चालला असताना वैज्ञानिकांद्वारे 'EeK' या टोपण नावाचा एक नवीन प्रकार आता जपानमध्ये सापडला आहे.

कोरोना विषाणूचा प्रकार बदलत चालला असताना वैज्ञानिकांद्वारे 'EeK' या टोपण नावाचा एक नवीन प्रकार आता जपानमध्ये सापडला आहे. या विषाणू बद्दलची माहिती एका माध्यमाने दिली आहे. जपानच्या सार्वजनिक प्रसारक मंडळाने एनएचकेचा(NHK) हवाला देत, ‘E484K’ हा कोरोनाचा नवीन विषाणू लस संरक्षण कमी करत असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात टोकियोच्या रूग्णालयात हा विषाणू सुमारे 70 टक्के रुग्णांमध्ये आढळला. एनएचकेच्या अहवालानुसार मार्च मध्येच टोकियो मेडिकल अँड डेंटल युनिव्हर्सिटी रुग्णालयात 14 रुग्णांपैकी 10 जणांमध्ये E484K हा विषाणू आढळला होता. परंतु त्यापैकी कोणीही परदेश दौऱ्यावरून आलेले नाही किंवा कोणाच्या संपर्कात आलेले नाहीत असे अहवालात म्हटले  होते. (A deadly form of the corona virus found in Japan)

नायजेरियाच्या कारागृहातून 2 हजार कैदी फरार

गेल्या वर्षीपासून कोरोना (Corona) संपूर्ण जगभरात थैमान घालतोय. जपान सध्या कोरोना विषाणूच्या ताज्या लहरी झेलत आहे. जुलै महिन्यात होणार असलेल्या उन्हाळी टोकियो ऑलिम्पिकच्या अगोदरच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. रविवारी टोकियोमध्ये 355 नवीन कोरोना रुग्ण नोंदले गेले होते, तर जानेवारीत ही रुग्ण वाढ 2,500 च्या शिखरावर होती. ओसाका प्रांतात रविवारी एकूण 594 नवीन कोरोनाचे रुग्ण नोंदले गेले आहेत. सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात लसीकरण अद्याप सुरू झाले नसले तरी, या नविन विषाणूच्या प्रसाराबद्दल आरोग्य तज्ञ चिंतेत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र जपानच्या रुग्णालयातील अधिकारी त्वरित यावर भाष्य करण्यास तयार नाहीत.

बांगलादेशातील नौका अपघातात 26 जणांचा मृत्यू

जपानचे (Japan) पंतप्रधान योशिहिड सुगा यांनी रविवारी नविन विषाणूच्या भीतीपोटी आपत्कालीन उपाययोजनांचा विस्तार करत असल्याचे सांगितले. लॉकडाउन अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रांच्या यादीमध्ये टोकियोची भर पडेल का, असे फुजी एका कार्यक्रमात विचारले असता सुगा यांनी, सर्व शक्यतांचा विचार केला जात असल्याचे नमूद केले. याशिवाय, कोठे विशेष फरक पडत असेल तर गरज पडल्यास संकोच न बाळगता लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

संबंधित बातम्या