जन्म दरात घट झाल्याने 'या' देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा चीन आता नव्या संकटाचा सामना करत आहे.

बिजिंग: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा चीन आता नव्या संकटाचा सामना करत आहे. सततच्या घटत्या जन्मदरामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनने आता 'हम दो हमारा एक' या धोरणात काही शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही आता चीनमधील जन्मदर वाढत नसल्यामुळे जन्मदरासंदर्भातील नियमांमध्ये आणखी सूट देण्याचा विचार चीनी प्रशासन करत आहे. चीनने मागील काही दशकात वाढत्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनमधील किमान संसाधनाचा वापर करण्यात यावा यासाठी जन्मदराच्या संदर्भातील कठोर कायदे केले होते.

चीननं जारी केला गलवान खोऱ्यातील संघर्षाचा व्हिडिओ

मात्र आता चीनला जन्मदराच्या घटत्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळेच चीनमधील आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याला धोका निर्माण झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर चीनच्या सरकारने कायद्यामध्ये काहीशी शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. चीन सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी नव्या धोरणानुसार सगळ्यात आधी पूर्वेकडील औद्योगिक पट्ट्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. ईशान्य चीनमधील अनेक प्रांत औद्योगिक क्षेत्रात येतात. याच प्रांतामध्य़े चीन सरकार नवे नियम लागू करण्याचा विचार करत आहे. 2020 मध्ये चीनमध्ये जन्मदराची 15 टक्क्यांनी घसरण झाली असल्याची शक्यता नोंदवली जात आहे. यासंबंधीचा अहवाल एप्रिल महिन्यात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. चीनच्या लिओनिंग, जिलीन, आणि हेइलोंगजियांग या प्रातांत 2019 मध्ये मोठ्याप्रमाणात जन्मदारात घट झाली असल्याचे पहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या