चीनमध्ये डेल्टाचा कहर 1500 विद्यार्थ्यांना केले डालियन शहरात 'कैद'!

जगात जिथुन कोरोनाच्या संसर्गास वेग आला, त्या शहरात डेल्टाने धुमाकुळ घातला आहे.
चीनमध्ये डेल्टाचा कहर 1500 विद्यार्थ्यांना केले डालियन शहरात 'कैद'!
DeltaDainik Gomantak

कोरोनाने जगाला विळखा घातलेला असताना, चीनमध्ये (China) आतापर्यंतचे सर्वात मोठे कोरोना (Corona) व्हायरसचे संकट पाहायला मिळत आहे. यापूर्वी, महामारीच्या सुरुवातीला चीनने संसर्गावर नियंत्रण मिळवले होते, पण यावेळी ते नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. मोठ्या प्रमाणात डेल्टाचे (Delta) रुग्ण ईशान्येकडील डेलियन मध्ये नोंदवली जात आहेत. चीन मध्ये खरच डेल्टा आहे का? शहरातील विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहात कैद (Imprisoned in hostel) करण्यात आले आहे. शहरातील झुआंगे विद्यापीठात अनेक डेल्टा प्रकरणे समोर आल्यानंतर रविवारी हा आदेश जारी करण्यात आला.

शेकडो विद्यार्थ्यांवरती (Students) पाळत ठेवण्यासाठी त्यांना वसतिगृहात हलवण्यात आले आहे. आता कैद विद्यार्थी डिजिटल पद्धतीने क्लास मध्ये उपस्थीती लावत आहेत. अन्न पाणी त्यांच्या खोल्यांमध्ये पोहचविले केले जात आहे. अनेक शहरातून येणाऱ्या लोकांना त्या भागात प्रवेश मिळत नाही. गेल्या एका आठवड्यापासून देशाच्या इतर भागांपेक्षा जास्त केसेस डेलियनमधून येत आहेत.

Delta
चिनी अधिकाऱ्याची अमेरिका,ऑस्ट्रेलियाला 'महायुद्धा'ची धमकी

वृत्तसंस्था रॉयटर्सने अधिकृत आकडेवारीच्या आधारे सांगितले आहे की, 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान येथे एकूण 1,308 प्रकरणे होती. उन्हाळ्यात आढळलेल्या 1,280 स्थानिक रुग्णांनाही या संखेने ओलांडले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत स्थानिक संसर्गाची ३२ नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी २५ डेलियनमध्ये नोंदवली गेली आहेत.

चीन आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डेल्टा वेरिएंट कहराचा सामना करत आहे. डेल्टा देशातील 21 प्रांतांमध्ये पसरला आहे. अहवाल सूचित करतात की अनेक प्रांतांमध्ये संसर्ग नियंत्रित करण्यात आला आहे. चीन सरकार संरक्षण म्हणून अनेक उपाय अवलंबत आहे.

ज्यामध्ये लॉकडाऊन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जोखमीच्या भागांमध्ये चाचणी साठीच्या अनेक फेऱ्या, मनोरंजनाशी संबंधित असणारी सर्व ठिकाणे बंद करणे, सार्वजनिक वाहनांवर बंदी आणि पर्यटनावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे अशा वेळी परिस्थिती बिघडताना दिसत आहे. बूस्टर डोस लागू करण्याचाही सरकार विचार करत आहे. सरकार कोरोना बाधित लोकांचे पाळीव प्राणी (Pets) देखील मारत असल्याची बातमी समोर येत आहे. अनेक लोक याबद्दल ऑनलाइन तक्रार करत आहेत. चीन मधील प्राण्यांच्या संरक्षणाशी निगडीत एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे की, 'पाळीव प्राणी हे लोकांचे आध्यात्मिक भागीदार आहेत आणि महामारीशी लढण्याच्या दिशेमध्ये त्यांना इजा होऊ नये हे बघने महत्वाचे आहे'.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com