Delta Variant: लस न घेतलेल्या लोकांना धोका अधिक- WHO

आतापर्यंत 104 देशांपर्यंत पोहोचलेला डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) लवकरच जगातील कोरोनाव्हायरसचा सर्वात प्रबळ व्हेरिएंट बनण्याची शक्यता आहे.
Delta Variant
Delta VariantDainik Gomantak

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे प्रमुख टेड्रोस अधनोम गेब्रेयसिस (Tedros Adhanom) यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा जगभर वेगाने पसरत आहे. आतापर्यंत 104 देशांपर्यंत पोहोचलेला डेल्टा व्हेरिएंट लवकरच जगातील कोरोनाव्हायरसचा सर्वात प्रबळ व्हेरिएंट बनण्याची शक्यता आहे. टेड्रोस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोविड -19 च्या रुग्णांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख पुढे म्हणाले, डब्ल्यूएचओ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र वगळता इतर सर्व प्रकरणांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील 10 आठवड्यांपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली होती मात्र अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यामुळे चिंतेत अधिक वाढ झाली आहे. कोविड 19 मध्ये सातत्याने बदल होत आहे आणि तो सासत्याने अधिक संसर्गजन्य होत आहे आपणास दिवसेंदिवस सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा सामना करावा लागला आहे ज्यामुळे जीव, जीवनमान आणि जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीची भीती निर्माण होऊ शकते. तसेच ज्या ठिकाणी लसी कमी आहेत आणि संक्रमणाचा कहर अजूनही चालू आहे त्या ठिकाणी हे आणखी वाईट आहे. जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र यावे लागेल, यावर त्यांनी भर दिला.

Delta Variant
पाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू!; ICMR-WHO कडून नाल्यातील पाण्याची चाचणी

लसीकरण न केलेल्या लोकांसाठी डेल्टा प्रकार अधिक धोकादायक

डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे हे लक्षात घेतल्यास परिस्थिती सर्वत्र सारखी नाही. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, आम्ही दोन ट्रॅकवर चालू असलेल्या महामारीच्या सावटाखाली आहे. ज्या ठिकाणी जास्त लसीकरण्यात आले आहे त्या ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार वाढत आहे. विशेषत: हा प्रकार लसीकरण न केलेल्या लोकांना अधिक संक्रमित करीत आहे. ज्यामुळे, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाव वाढत आहे. त्याच वेळी, ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे तेथे परिस्थिती आणखी जास्त खराब होत आहे. डेल्टा प्रकार अधिक संक्रामक आहे, म्हणून ते टाळणे फार महत्वाचे आहे, असा इशाराही टेड्रास यांनी दिला आहे.

Delta Variant
कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचा WHO चा उपक्रम सुरु

डेल्टा व्हेरिएंटमुळे अनेक देशांत पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची वेळ

हे लक्षात घेण्यासारखे आहे की डेल्टा व्हेरिएंट जगातील बर्‍याच देशांमध्ये तीव्र वेगाने पसरत आहे. या व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करावे लागतील. डेल्टाच्या प्रसारामुळे ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागू करण्याची वेळी आली आहे. याशिवाय शेजारच्या बांग्लादेशातही लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत, लसीकरणाकडे हा विषाणू टाळण्यासाठी एक शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. यामुळेच जगभरातील देश लसीकरणावर जोर देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com