Balochistan:'...ले के रहेंगे आझादी,' बलुच फुटीरतावाद्यांचा निशाणा बनतायेत चीनी लोक

पाकिस्तानमध्ये (Pakistan) चिनी वंशाच्या नागरिकांवर हल्ले होत आहेत.
Balochistan
BalochistanDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये चिनी वंशाच्या नागरिकांवर हल्ले होत आहेत. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ( BRI) चे काम रोखण्यासाठी बलुच फुटीरतावादी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटते की, चीन पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना त्यांच्या संसाधनांची लूट करण्यासाठी सहकार्य करत आहे. इस्लामाबाद स्थित स्वतंत्र थिंक टँक FATA रिसर्च सेंटर (FRC) चे कार्यकारी संचालक मन्सूर खान मेहसूद म्हणाले की, बलुच फुटीरतावादी चीनला आपला शत्रू मानतात. (Demand for independence in Balochistan, Baloch separatists escalate attacks on Chinese nationals in Pakistan)

दरम्यान, फुटीरतावाद्यांचा असा विश्वास आहे की, चीन 'बलुचिस्तानची संसाधने लुटण्यासाठी' पाकिस्तानी सुरक्षा दलांशी हातमिळवणी करत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी बलुच फुटीरतावादी सतत चिनी लोकांना लक्ष्य करत आहेत. मेहसूद म्हणाले, 'यामुळेच आम्ही चिनी कंपन्यांना अनेकदा बलुचिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे.'

Balochistan
Pakistan: पूर्व महिला मंत्र्याला पोलिसांनी नेले फरफटत, इम्रान खान म्हणाले, 'अपहरण'

चीनने दहशतवादी कारवायांवर बंदी घालण्याची मागणी केली

बलुच बंडखोर त्यांच्या कारवायांमधून मातृभूमीला 'मुक्त' करण्यासाठी किती हताश आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. एशिया टाईम्सच्या म्हणण्यानुसार, सध्याची परिस्थिती पाहता, चिनी कंपन्या ज्या भागात अब्जावधी डॉलरच्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत धोरणात्मक प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या आहेत, त्या भागातील दहशतवादी कारवायांवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करत आहे.

Balochistan
Pakistan: 'मला अटक केल्यास...,' इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला इशारा

दुसरीकडे, चीनचे (China) पंतप्रधान ली किंग आणि पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्यात 16 मे रोजी पहिली चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या चिनी नागरिकांची सुरक्षा वाढवणे आणि $60 अब्ज चायना-पाकिस्तान (Pakistan) इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com