कोरोनावर ‘डेक्‍सामेथेसॉन’ प्रभावी

Avit Bagle
सोमवार, 20 जुलै 2020

ब्रिटिश शास्त्रज्ञांचा दावा; ‘एचसीक्यू’पेक्षाही परिणामकारक

लंडन

कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी उपलब्ध औषधांच्या पुनर्वापरासह नवीन औषधांच्या चाचण्याही घेण्यात येत आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार ‘डेक्‍सामेथेसॉन’ नावाचे स्टेरॉईड कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.
अत्यवस्थ रुग्णाच्या उपचारासाठीही स्वस्तात उपलब्ध असलेले हे औषध परिणामकारक ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. इंग्लंडच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ च्या शास्त्रज्ञांचे हे संशोधन ‘इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्विन (एचसीक्यू) पेक्षाही हे औषध प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

कोरोनावरील औषधांची परिणामकारकता
१) डेक्‍सामेथेसॉन ः
संशोधक ः ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे नेतृत्व असलेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञांचे संशोधन.
परिणाम ः
- व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या ३६ टक्‍क्‍यांनी कमी करतो.
- १८ टक्के रुग्णांना फक्त ऑक्‍सिजनच्या मदतीची गरज
- प्राथमिक अवस्थेत हे औषध देणे धोक्‍याचे ठरू शकते

२) हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्विन ः
संशोधक ः ऑक्‍सफर्ड विद्यापीठ
परिणाम ः
- अत्यवस्थ रुग्णांसाठी परिणामकारक नाही.
- २८ दिवसांच्या चाचण्यांमध्ये साधारण उपचार घेणाऱ्यांपेक्षा ‘एचसीक्यू’ घेणाऱ्यांना मृत्यूचा धोका जास्त
- ‘‘एचसीक्यू’मुळे कोरोनाचा धोका कमी होईलच असे नाही.
- अल्प लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांसाठी फारसे उपयोगी नाही.
- इतर परिणाम होण्याची दाट शक्यता

३) रेमडिसिव्हिअर ः
उत्पादक ः गिलियड सायन्सेस
परिणाम ः
- सध्या उपलब्ध औषधांमध्ये सर्वाधिक परिणामकारक
- डेक्‍सामेथेसॉन आणि ‘एचसीक्यू’बरोबर या औषधाची चाचणी घेणे गरजेचे
- लहान मुलांवरील वैद्यकीय चाचणीलाही सुरवात
- पुरवठा मर्यादित.

आमच्या संशोधनातून कोणते औषध जास्त परिणामकारक आहे याचा अंदाज डॉक्‍टरांना येईल. विविध औषधांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेऊन तुलनात्मक अध्ययन करण्याची गरज आहे. जेणेकरून एक प्रभावी उपचार पद्धत आणि औषध निश्‍चित करता येईल.
- डॉ.अँथोनी फौकी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, ब्रिटन.

संबंधित बातम्या