जगातील 'या' अनोख्या स्टेशनची खास गोष्ट माहीत आहे, तुम्हाला? जाणून घ्या

JAPAN.jpg
JAPAN.jpg

तुम्ही अशा कोणत्या रेल्वे स्थानकाचे (railway station) नाव ऐकले आहे का जिथे प्रवेशद्वार किंवा बाहेर जाण्याचा रस्ता नाही. याचा अर्थ येथे फक्त ट्रेननेच (train) पोहोचता येते आणि फक्त ट्रेननेच परत जात येऊ शकते. तेथे तिकीट काउंटर नाही, चौकशी किंवा हेल्पडेस्क देखील  नाही. हे स्टेशन भारतात नाही तर जपानमध्ये (Japan) आहे.होय! जपानचा सेरियू मिहाराशी एकी (Seiryu Miharashi Eki Station) हे जगातील एक अनोखे रेल्वे स्टेशन आहे. यमागुची (Yamaguchi) प्रदेशातील निशिकी नदीवर बांधलेले हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, जेथे पर्यटक (Tourists) निसर्गाची (nature) प्रशंसा करण्यासाठीच येतात, म्हणजेच नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. (Do you know the special thing about this unique station in the world Find out)

सीरयू मिहारशी एकी म्हणजे एक स्टेशन आहे  जिथून धबधबे (Waterfalls) स्पष्टपणे दिसू शकतात. एवढेच नव्हे तर इथे फक्त रेल्वेनेच पोहोचता येते. येथे रॅम्प किंवा थांबायला जागा नाही. स्टेशन येथे अशा प्रकारे बांधले गेले आहे की येथे येणार्‍या लोकांनी ट्रेनने यावे आणि येथील सौंदर्याचा आनंद घ्यावा आणि ट्रेनमध्येच परत जावे.

जपानमधील लोक हे ठिकाण पाहण्यासाठी जातात तिथले नैसर्गिक वातावरण पाहण्यासाठी ,तिथे असलेली हरियाली या वातावरणामुळे जपानमधील लोक या ठिकाणाला चांगलीच पसंती देतात  . सिंगल रेल्वे लाईन या रूट्सपासून दररोज 10 ट्रेनस  तिथून जातात, ज्यामध्ये 4 ट्रेन्स गुलाबी, हिरवी , निळी आणि पिवळी या रंगाची असतात . फक्त पावसाळ्यामधील धबधबे ,डोंगर आणि फुलांचे पर्यटन दर्शविण्यासाठी टूरिस्ट या रूटमधून प्रवास करतात.  

मिडिया रिपोर्ट्सनुसार ,सेरियू मिहाराशी एकी हे स्टेशन  वर्षांमध्ये एकदाच म्हणजे 19 मार्च या दिवशी उघडला जातो. स्टेशन जवळची सुमारे सात एकर जमीन नऊ वर्षापूर्वी नॅचरल  पार्क म्हणून घोषित केले गेले होते . येथे येणारे पर्यटक या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com