जगातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानके तुम्हाला माहीत आहेत का?

शहराचे सौंदर्य एक्सप्लोर करण्याचा ट्रेन्स (Trains) हा एक उत्तम मार्ग मानला जातो.
जगातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानके तुम्हाला माहीत आहेत का?
Chhatrapati Shivaji Station, Mumbai (India)Dainik Gomantak

भारतात (India) सर्वाधिक प्रवास रेल्वेने केला जातो. रेल्वे आणि प्रवाशांचे एक अजूड नाते निर्माण झाले आहे. रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशी निसर्ग सौंदर्याबरोबर रेल्वे स्थानकांचे सौंदर्यही आपल्या डोळ्यांमध्ये साठवत असतात. शहराचे सौंदर्य एक्सप्लोर करण्याचा ट्रेन्स हा एक उत्तम मार्ग मानला जातो.

जगात अशी काही आश्चर्यकारक आणि सुंदर रेल्वे स्थानके आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. जे स्वतःमध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. ही रेल्वे स्थानके खास डिझाइन केलेली असून जागतिक स्तरावर स्थापत्यशास्त्रातील चमत्कार म्हणून ओळखली जातात.

Chhatrapati Shivaji Station, Mumbai (India)
चीन अमेरिकेतील तणाव आणखीन वाढणार? ट्रम्प,बायडन यांची सारखीच रणनीती

चला तर मग जगातील सर्वात भव्य रेल्वे स्थानकांची व्हर्च्युअल टूर करुया:

छत्रपती शिवाजी स्टेशन, मुंबई (भारत)

युनेस्कोचे (UNESCO) जागतिक वारसा स्थळ, छत्रपती शिवाजी स्थानक हे मुंबईतील (Mumbai) पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हा एक प्रकारचा वास्तुशिल्पीय चमत्कार पारंपारिक भारतीय तत्वे आणि व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचा सुंदर मिलाफ आहे. हे महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले आहे.

ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यूयॉर्क (यूएस)

जगातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, ग्रँड सेंट्रल टर्मिनल (Grand Central Terminal) हे न्यूयॉर्क शहरातील एक महत्त्वाची ओळख आहे. हे स्टेशन त्याच्या सुंदर ब्यूक्स-आर्ट्स आर्किटेक्चरमुळे अनेक लोकप्रिय हॉलीवूड चित्रपटांमध्ये वैशिष्ट्यीकृत केले गेले आहे.

20 व्या शतकात बांधलेले, टर्मिनल त्याच्या व्हॉल्टेड सीलिंगसाठी प्रसिद्ध आहे, जे नेत्रदीपक पेंटिंगमध्ये केले आहे. तुम्ही इमारतीच्या अगदी मध्यभागी असलेले चार-मार्गी स्मारक घड्याळ चुकवू शकत नाही.

सेंट पॅनक्रस इंटरनॅशनल स्टेशन, लंडन (यूके)

1868 मध्ये बनविण्यात आलेल्या या (St. Pancras International Station) आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकाचे सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. व्हिक्टोरियन काळातील अभियांत्रिकी चमत्कार म्हणून ओळखले जाणारे, हे स्टेशन त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध असून मनोरंजनाच्या अनेक संधी उपलब्ध करुन देते.

रामसेस स्टेशन, कैरो (इजिप्त)

आपण इजिप्तमधील कोणत्याही गोष्टीपासून सौंदर्य आणि अनंत अशा कृपेची अपेक्षा करु शकता. कैरोमधील रामसेस स्टेशन (Ramses Station) हे इजिप्शियन वास्तुशिल्पाच्या चमत्काराचा नमुना आहे.

स्टेशनचे नाव फारो रामसेस II (याला रामेसेस द ग्रेट असेही म्हणतात, इजिप्तच्या एकोणिसाव्या राजवंशातील तिसरा फारो) च्या पुतळ्याच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे, जो 1950 च्या दशकात येथे होता.

Chhatrapati Shivaji Station, Mumbai (India)
अमेरिकेतील निवडणूकीपूर्वी ट्रम्प-किम शिखर बैठक व्हावी

क्वालालंपूर स्टेशन, क्वालालंपूर (मलेशिया)

औपनिवेशिक आणि स्थानिक स्थापत्यशैलींचे सुंदर मिश्रण, क्वालालंपूर स्टेशन त्याच्या भव्य दर्शनी भागासाठी प्रसिद्ध आहे. ती काचेची आणि लोखंडी घुमट असलेली ठराविक व्हिक्टोरियन इमारत दिसते. क्वालालंपूरमधील (Kuala Lumpur Station) एक आवश्‍यक स्मारक.

कानाझावा स्टेशन, इशिकावा (जपान)

हे इशिकावा भागातील मुख्य स्थानक असून दररोज अनेक हाय-स्पीड ट्रेन येतात. काचेचे भव्य घुमट आणि लाकडी गेट असलेले स्टेशनचे आधुनिक आणि भविष्यकालीन वास्तुकला पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हेलसिंकी सेंट्रल स्टेशन (फिनलंड)

हेलसिंकी मधील हे विस्मयकारी रेल्वे स्टेशन त्याच्या सुंदर वास्तुकला आणि मनोरंजक इतिहासासह प्रचंड क्लॉक टॉवरसाठी ओळखले जाते. प्रवासी वेळेवर पोहोचावेत म्हणून घड्याळ एक मिनिट उशिरा सेट केले जाते, असा लोकांचा समज होता. नंतर, ते केवळ एक मिथक असल्याचे निष्पन्न झाले.

हैदरपा स्टेशन, इस्तंबूल (तुर्की)

हे भव्य स्थानक 1906 पासून अस्तित्वात आहे. हे ऑट्टोमन साम्राज्य आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीचे प्रतीक होते. आदर्श निओ-रेनेसां वास्तुकला प्रदर्शित करणारे, स्टेशन तुर्की आणि मध्य पूर्वेकडील देशांना प्रवास करणार्‍या ट्रेनची सेवा देत असे.

ड्युनेडिन स्टेशन, ड्युनेडिन (न्यूझीलंड)

न्यूझीलंडमधील ड्युनेडिन स्टेशन हे देशातील सर्वाधिक छायाचित्रांचे आकर्षण म्हणून प्रसिद्ध आहे. हे स्टेशन 1906 मध्ये बांधले गेले होते, तेव्हापासून ते न्यूझीलंडमधील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे.

आम्सटरडॅम सेंट्रल स्टेशन (नेदरलँड)

आणखी एक भव्य अभियांत्रिकी चमत्कार, अॅमस्टरडॅम सेंट्रल 19 व्या शतकात बांधले गेले. ही सुंदर रचना तीन कृत्रिम बेटांवर आणि 8000 पेक्षा जास्त लाकडी खांबांवर उभी आहे. अॅमस्टरडॅममधील हे एक अविस्मरणीय आकर्षण आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com