Expressions: डॉक्टरांची कमाल, ही बातमी वाचून व्हाल थक्क!

Baby Photo from Fetus: यामध्ये गर्भात वाढणाऱ्या मुलांचे भाव मातेच्या अन्नाच्या चवीवर दाखवण्यात आले आहेत.
Expressions
ExpressionsDainik Gomantak

Unborn Baby Expressions Goes Viral: मेडिकल सायन्सचे जग इतके विस्तारले आहे की, अनेकवेळा डॉक्टर आपल्या अभ्यासातून आणि नवनवीन शोधातून लोकांना आश्चर्यचकित करत असतात. कधी कधी ते स्वतःही आश्चर्यचकित होतात. ब्रिटनमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका विद्यापीठाच्या अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या मुलाचे भाव मातेच्या अन्नाच्या चवीवर दाखवण्यात आले आहेत.

गर्भवती महिलांच्या चवीवर प्रयोग

वास्तविक, सीएनएनने आपल्या एका रिपोर्टमध्ये या अभ्यासाविषयी सांगितले आहे. अहवालानुसार, हा अभ्यास डरहम विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी गरोदर महिलांच्या आहाराचा आराखडा ठेवला. आहार देण्याआधी आणि नंतर प्रयोग केल्याची घटना धक्कादायक होती. या संशोधकांनी महिलांना (Women) कोबीच्या कॅप्सूल आणि गाजराच्या कॅप्सूल दिल्या. तर काही महिलांना कॅप्सूलही देण्यात आली नाही.

Expressions
रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात वाढू शकते ऊर्जा संकट, सरकारची तयारी सुरू

यानंतर, अभ्यासाचे निष्कर्ष समोर आले, तेव्हा असे आढळून आले की, गाजराच्या कॅप्सूलचा स्वाद घेतलेल्या आईच्या पोटात जन्मलेली बाळे हसताना दिसतात, तर कोबी असलेल्या कॅप्सूल दिल्यानंतर त्यांनी विचित्र भाव व्यक्त केला. हे पाहून संशोधकांची टीम आश्चर्यचकित झाली. त्यांनी लगेच ते रेकॉर्ड केले आणि त्याचे फोटोही काढले.

पहिले प्रकरण

अहवालानुसार असे प्रयोग समोर आलेले हे पहिलेच प्रकरण आहे. कोबीची चव घेतल्यानंतर जन्मलेली बाळं हसताना दिसत असल्याचं अल्ट्रासाऊंड रिपोर्टमधून स्पष्ट झालं. त्याच वेळी, ज्यांना काहीही दिले गेले नाही अशा महिलांच्या मुलांमध्ये कोणतेही एक्सप्रेशन दिसून आले नाही.

Expressions
Canada: कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जारी

शिवाय, पुढे असेही सांगण्यात आले की, या प्रयोगातून असे आढळून आले की, बाळाला आईच्या पोटातच चव कळू लागते. गरोदरपणात बाळाची चव आईच्या जेवणावरुन ठरु लागते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) मुलांच्या या एक्सप्रेशनची छायाचित्रे प्रचंड व्हायरल होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com