जापनीज रुग्णालयाचं वास्तव! शौचालयाला जे पाणी वापरतात तेच पिण्यासाठीही...

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत (Health) खूप जागरूक आहे. त्याचबरोबर जपानचे (Japan) लोकही त्याची खूप काळजी घेतात.
जापनीज रुग्णालयाचं वास्तव! शौचालयाला जे पाणी वापरतात तेच पिण्यासाठीही...
Doctors and patients were drinking toilet water for almost 30 years in japanDainik Gomantak

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत (Health) खूप जागरूक आहे. त्याचबरोबर जपानचे (Japan) लोकही त्याची खूप काळजी घेतात. तिथल्या लोकांना अतिशय आरामात आणि शिस्तीत राहायला आवडतं. त्यांच्या खाण्यापिण्याचीही खूप काळजी घेतात. त्यांना स्वच्छतेने (Hygiene) जगणे आवडते, परंतु आता जी बातमी समोर येत आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जपानमध्ये एक असे हॉस्पिटल आहे जिथे गेल्या 30 वर्षांपासून टॉयलेटचे पाणी वापरले जात होते. होय, ही बातमी पूर्णपणे खरी आहे. याची खबर रुग्णालयातील लोकांना नुकतीच मिळाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलमधील लोकांना अलीकडेच कळले आहे की ते जवळपास 30 वर्षांपासून टॉयलेटचे पाणी वापरत होते. ओसाका युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने 20 ऑक्टोबर रोजी पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकल्याचा अहवाल दिल्याची माहिती आहे. त्यामुळे खूप दिवसांनी बातमी मिळाली. रुग्णालयाच्या आवारात काही ठिकाणी पिण्याच्या पाईपचे कनेक्शन चुकीच्या जागेवरून बसविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्याची तपासणी केली असता शौचालयाला फक्त त्याचा पाईप जोडल्याचे आढळून आले. त्याच्या फिटिंगला जवळपास 30 वर्षे झाली आहेत. आता आम्ही तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल 1993 मध्ये सुरू झाले होते.

Doctors and patients were drinking toilet water for almost 30 years in japan
रशिया युद्धाच्या तयारीत!

या पाण्याचा वापर रूग्णालयात उपस्थित नागरिक व रूग्ण करीत होते. ते पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी आणि धुण्यासाठी वापरत. रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा हे सत्य सर्वांच्या लक्षात आले. आश्‍चर्याची बाब म्हणजे या हॉस्पिटलमध्ये दर आठवड्याला पाण्याची तपासणी केली जाते, असा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान पाण्याची कोणतीही समस्या नसल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.

आता ही बातमी सर्वत्र पसरली आहे. त्याच वेळी, रुग्णालयाचे संचालक आणि उपाध्यक्ष काजुहिको नाकतानी यांनी सर्व माजी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. ते म्हणाले, "प्रगत वैद्यकीय सेवा देणारे विद्यापीठ रुग्णालय चिंतेचे कारण बनले आहे याबद्दल मला खूप खेद वाटतो." त्याचवेळी, आता काळजीपूर्वक रुग्णालय नियमितपणे पाण्याच्या पाईपची तपासणी करेल, असेही ते म्हणाले. आता ही बातमी येताच सोशल मीडिया वापरकर्ते आणि जपानमधील लोक खूपच हैराण झाले आहेत आणि घाबरले आहेत, तर कोणीही या रुग्णालयात जाण्यास तयार नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com