म्यानमारमधील डॉक्टरांचा लष्काराच्या बंडखोरीला विरोध; 70 रुग्णालये बंद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

म्यानमारमधील  लष्काराच्या विरोधात देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. म्यानमारमध्ये सर्वत्र लष्काराचा जोरदार निषेध होत आहेत.

म्यानमार :  म्यानमारमधील  लष्काराच्या विरोधात देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. म्यानमारमध्ये सर्वत्र लष्काराचा जोरदार निषेध होत आहेत. या निषेधात वैद्यकीय कर्मचारीदेखील सामील झाले आहेत. देशातील एकूण 70 रुग्णालयांमध्ये काम करत असलेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी लष्कराच्या या कारवाईविरोधात काम थांबविले आहे. म्यानमारमध्ये आत्तापर्यंत कोरोना विषाणूमुळे  3,100 पेक्षा जास्त लोकांचे बळी गेले आहेत. आम्ही हुकूमशाही आणि बेकायदेशीर लष्करी नियमाच्या कोणत्याही आदेशाचे पालन करणार नाही आहे, असे या वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या समूहाने निवेदनात म्हटले आहे. 

‘’लढायचं असेल तर पाकिस्तान आणि चीनशी लढा’’

"सैनिकांनी त्यांच्या जागी परत जावे, अशी माझी इच्छा आहे, आम्ही डॉक्टर रूग्णालयात जाणार नाही.आम्ही हा संप किती काळ चालू ठेवू हे सांगता येणार नाही, हे लष्कराच्या निर्णयावर अवलंबून आहे. विद्यार्थी आणि युवकांचे गट मोठ्या प्रमाणात निषेधात सामील झाले आहेत", असे यांगून शहरातील एका 29 वर्षीय डॉक्टरने सांगितले. दरम्यान, सोमवारी म्यानमारच्या लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी लागू करत, देशाचा ताबा घेतला.या घोषणेनंतर लष्कराच्या उठाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अ‍ॅमेझॉनचे CEO जेफ बेझोस देणार पदाचा राजीनामा

इर्रावड्डी  या प्रस्थापित ऑनलाइन वृत्तसेवाने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सर्वोच्च नेता असलेल्या आंग सॅन सू की सू ची आणि देशाचे अध्यक्ष विन मायंट यांना  पहाटे ताब्यात घेतलं होतं. लष्कराकडून उपराष्ट्रपती आणि माजी जनरल मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सत्तारूढ अलेल्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य, खासदार आणि प्रादेशिक कॅबिनेट सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे

 

संबंधित बातम्या