अमेरिकेत श्‍वानाचा कोरोनामुळे बळी

अवित बगळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.

न्यूयॉर्क

मानवजातीबरोबर आता पाळीवप्राण्यांचाही कोरोनाच्या हल्ल्यात मृत्यू होऊ लागला आहे. अमेरिकेतून अशीच पहिली घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये जर्मन शेपड जातीच्या श्‍वानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. न्यूयॉर्कमधील नादिया या प्राणीसंग्रहालयातील वाघांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते बरे झाले. मात्र आता हा संसर्ग पाळीव प्राण्यांमध्येही पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्कमधील रॉबर्ट मैहोनी यांच्या "बडी' नावाच्या सात वर्षांच्या श्‍वानाला कोरोनाची लागण झाली होती. श्‍वसनाचा त्रास होत असल्याने त्याच्यावर पशुचिकित्सकांकडून उपचार सुरू होते. मात्र त्याच्या मृत्यूनंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्याला कोरोनाची झाल्याचे उघड झाले. कोरोनामुळे मृत्यू झालेला अमेरिकेतील तो पहिला श्‍वान आहे. गेले दोन महिने त्याच्यावर उपचार सुरू होते. 11 जुलैला त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या रक्‍ताच्या नमुन्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यात हे निदान झाले. तसेच त्याला कॅन्सर असल्याचीही बाब समोर आली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 12 श्‍वास आणि 10 मांजर, एक सिंह आणि दोन वाघांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित बातम्या