बायडेन प्रशासनात महिलांचे वर्चस्व

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

 अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्‍या आर्थिक सल्लागार गटातील वरिष्ठ सदस्यांची नावे लवकरच जाहीर होणार असून त्यात भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालकपदी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. 

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्‍या आर्थिक सल्लागार गटातील वरिष्ठ सदस्यांची नावे लवकरच जाहीर होणार असून त्यात भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालकपदी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. 

अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे 

२० जानेवारी रोजी हाती घेणाऱ्या बायडेन यांनी मंत्रिपदावर आणि संभाव्य प्रशासनातील प्रमुख पदांवर महिलांची नियुक्तीस प्राधान्य दिले आहे. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वांच्या पदांवरही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ‘सीआयए’च्या संचालकपदी अल्वरिल हेन्स, गृहमंत्रिपदी लुलेन राईस, संरक्षण मंत्रिपदी मिशेल फ्लोरनोय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक सल्लागार परिषदेच्या प्रमुखपदी अर्थतज्ज्ञ सिसिलिया रोस यांची निवड होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी कमला हॅरिस आहेतच.

कमला हॅरिस यांच्याप्रमाणे बायडेन प्रशासनात अजून काही भारतीय वंशाच्या महिलांची महत्त्वाच्या पदांवर निवड होणार असल्याची चर्चा आहे, त्यात एक नाव म्हणजे नीरा टंडन यांचे आहे. वॉशिंग्टनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये नीरा टंडन यांचा समावेश २०१२मध्‍ये ‘नॅशनल जर्नल’ने केला होता. याशिवाय २०१४मधील ‘ वर्किंग वूमेन मासिकाच्या जगातील ५० प्रभावशाली मातांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. या वर्षीदेखील ‘एली’ मासिकाने त्यांची सर्वांत प्रभावी महिलांमध्ये निवड केली आहे.  

 

अधिक वाचा :

श्रीलंकेत एका कारागृहात झालेल्या हिंसाचारात ८ कैदी ठार

इंडोनेशियामधील इले लेवोटोलोक ज्वालामुखी झाला जागृत 

 

संबंधित बातम्या