अमिरातीला ‘एफ ३५’ विमाने विकण्याचा विचार

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

इस्त्राईल व अमिरातीने शांततेसाठी  मोठी प्रगती केली आहे.  यामुळे कराराचे पुनरावलोकन झाले. अमिरातीकडून या सर्वोत्तम लढाऊ विमानाच्या खरेदीची ऑर्डर नोंदविली जाऊ शकते. - डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन: संयुक्त अरब अमिरातीला ‘एफ ३५’ ही अत्याधुनिक लढाऊ विमाने विकण्याचा अमेरिका विचार करत असल्याची स्पष्टोक्ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिली. ते म्हणाले,‘‘अमिरातीकडे पैसा असून त्यांना अमेरिकेची विमाने विकत घेणे परवडू शकते. त्यामुळे अमिरातीकडून जगातील या सर्वोत्तमक लढाऊ विमानाच्या खरेदीची ऑर्डर नोंदविली जाऊ शकते. आपण काय होते ते पाहूया.’’ 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या विक्रीला विरोध दर्शविला होता. इस्त्राईलने अमेरिका व अमिरातीमधील कराराला गुप्त संमती दिल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला होता.

संबंधित बातम्या