सुपरमॅन झाल्यासारख सारखं वाटतंय

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

कोविडवर उपचार घेतल्यानंतर मला ‘सुपरमॅन’ झाल्यासारखे वाटत आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोविडच्या उपचारामुळे आजाराशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाली असून आपण कोठेही मुक्तसंचार करु शकतो, असेही ट्रम्प म्हणाले. 

वॉशिंग्टन:  कोविडवर उपचार घेतल्यानंतर मला ‘सुपरमॅन’ झाल्यासारखे वाटत आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोविडच्या उपचारामुळे आजाराशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाली असून आपण कोठेही मुक्तसंचार करु शकतो, असेही ट्रम्प म्हणाले. 

दोन आठवड्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना तीन रात्र आणि चार दिवसासाठी सैनिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर आपण तंदुरुस्त असल्याचे त्यांनी जाहीर केले. व्हाइट हाऊसच्या वैद्यकीय पथकाने देखील त्यांना प्रचार सभा घेण्याची परवानगी दिली.

काल ट्रम्प यांचे पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन येथील विमानतळावर जोरदार स्वागत झाले. येथील सभेत ते म्हणाले, की मी काही औषधे घेतल्यानंतर बरा झालो. ती कोणती औषधे होती, हे मला ठाउक नाही. ती प्रतिकारक्षमता विकसित औषधी होती का, हे देखील मला ठाउक नाही. परंतु त्यानंतर मी स्वत:ला सुपरमॅन समजू लागलो आहे. यावेळी ट्रम्प यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

बायडेन यांच्या विजयासाठी चीन आसुसलेला
ट्रम्प म्हणाले, की  ज्यो बायडेन यांच्या विजयासाठी डाव्या विचारसरणीचे लोक, चीन आसुसलेले आहेत. कारण बायडेन हे आपल्या देशातील नोकऱ्या चिनी नागरिकांना बहाल करतील. या सुस्त व्यक्तीच्या (बायडेन) हाती सत्ता गेली तर अमेरिकेवर चीनचे वर्चस्व राहिल. आगामी चार वर्षात आपण अमेरिकेला उत्पादन क्षेत्रात सामर्थ्यवान देश करु आणि चीनवरची अवलंबिता संपून टाकू, असे ट्रम्प म्हणाले. 

संबंधित बातम्या