डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाबंदी दहा एप्रिलपर्यंत वाढवली

PTI
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावरील बंदीच्या कालावधीत १० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. अध्यक्षपदावर असेपर्यंत व्हिसाबंदी मुदतवाढीचा निर्णय लागू राहिल, असे म्हटले आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वॉशिंग्टन :  मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावरील बंदीच्या कालावधीत १० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. अध्यक्षपदावर असेपर्यंत व्हिसाबंदी मुदतवाढीचा निर्णय लागू राहिल, असे म्हटले आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता जानेवारीत ज्यो बायडेन हे अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. परंतु तोपर्यत ट्रम्प सत्तेवर राहणार आहेत. आपल्या कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात घेतलेले निर्णय लागू करण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. याप्रमाणे आज त्यांनी व्हिसा बंदी संबंधीच्या निर्णयाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकी कायद्याचे उल्लंघन करुनही संबंधित देशांनी त्यांच्या नागरिकांना मायदेशी न बोलावल्याने अध्यक्ष ट्रम्प यांनी अशा देशांवर व्हिसा बंदी लागू केली. या व्हिसा बंदीची मुदत ३१ डिसेंबरला संपत होती. आता त्याचा कालावधी १० एप्रिलपर्यत वाढवला आहे. ट्रम्प यांच्या आदेशानुसार नागरिकांना परत न बोलावणाऱ्या देशांना व्हिसा न देण्याचा अधिकार परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांना बहाल करण्यात आला. कोविड-१९ आणि सामुहिक आरोग्य या आधारावर जोखीम वाढत असल्यामुळे व्हिसाबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या