डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार होताच चीनने घेतला मोठा निर्णय

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

 चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या टीममधील 28 जणांसाठी आपली दारे बंद केले असून, त्यांच्यावर चीनसह  हॉंगकॉंग आणि मकाऊमध्ये  बंदी घालण्यात आली आहे.

बीजिंग: जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटास चीनला जबाबदार धरत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपांची राळ उडवली. पर्यायाने चीनला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.मात्र डोनाल्ड ट्रम्प  अध्यक्ष पदावरुन पायउतार होताच चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या टीममधील 28 जणांसाठी दारे बंद केले असून, त्यांच्यावर चीनसह हॉंगकॉंग आणि मकाऊमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी  प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले की,"मागील काही वर्षात अमेरिकेत काही चीनविरोधी स्वार्थी नेत्यांकडून आपला राजकीय हेतू साध्य करुन घेण्यासाठी अमेरिका आणि चीनमधील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले.अमेरिकेतील राजकिय नेत्यांनी स्वार्थासाठी नियोजनबद्ध पावले उचलली ज्यामुळे चीनच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप होत राहिला.या नेत्यांमुळे चीनी नागरिक अपमानित झालेचं त्याचबरोबर अमेरिका आणि चीन सबंधांचे सुध्दा मोठे नुकसान झाले. चीन सरकार देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि हिताचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे  कटिबद्ध आहे," असे सांगत ट्रम्प यांच्यासह त्यांच्या टीममधील  28 जणांवर बंदी घातली आहे.

संबंधित बातम्या