डोनाल्ड ट्रम्प जाता जाता जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणार..?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्क्ष म्हणून काही दिवसांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्क्ष पदावरून पायउतार होण्याआधी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा रद्द करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्क्ष म्हणून काही दिवसांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्क्ष पदावरून पायउतार होण्याआधी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा रद्द करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. अमेरिकेचं नागरिकत्व नसलेल्यांचं मुल जर अमेरिकेत जन्माला आलं, तर त्याला अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व मिळतं. हि तरतूद अमेरिकेच्या संविधानामध्ये करण्यात आली आहे.

याआधीदेखील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना या तरतुदीबद्दलची आपली नाराजी बोलून दाखवली होती व जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालण्याचा ते करत होते. सध्या संविधानिक तरतूदीनुसार, अमेरिकेत जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाला नागरिकत्व मिळतं. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प किंवा इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी याबाबतील कोणताही आदेश जारी केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं.
 

अधिक वाचा : 

ट्विटर खात्याचे हस्तांतरण होणार

कॅनडामधून भारतात येणार प्राचीन मूर्ती

संबंधित बातम्या