ट्विटर खात्याचे हस्तांतर होणारच

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

ट्विटरवरील खाते हस्तांतरीत करताना ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांच्या टीमला कोणतीही माहिती शेअर करायची आवश्‍यकता नसून या खात्यावरील सर्व माहिती साठविली गेली असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. 

लॉस एंजेलिस : विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार अखेरपर्यंत मानली नाही तरी, नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी २० जानेवारीला शपथ ग्रहण करताच त्यांच्याकडे ट्विटरवरील अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी असलेल्या 
@POTUS या खात्याचे अधिकार सुपूर्द करणार असल्याचे ट्विटर कंपनीने जाहीर केले आहे. हे अध्यक्षांचे अधिकृत ट्विटर खाते आहे. 

ट्विटरवरील खाते हस्तांतरीत करताना ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांच्या टीमला कोणतीही माहिती शेअर करायची आवश्‍यकता नसून या खात्यावरील सर्व माहिती साठविली गेली असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. 

 ट्रम्प प्रशासनाकडून सहकार्य
 सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व प्रशासकीय प्रक्रिया ट्रम्प प्रशासनाने पूर्ण केली असल्याचा दावा ‘व्हाइट हाउस’तर्फे करण्यात आला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्यापही पराभव मान्य केला नसल्याने नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सहकाऱ्यांना प्रशासकीय सूत्रे स्वीकारण्यात अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र निवडणूक निकालाची अधिकृत प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे निदर्शनास आणून दिले. ३ नोव्हेंबरला झालेल्या निवडणूकीत अमेरिकी जनतेने प्रतिनिधींची निवड केली असून हे प्रतिनिधी पुढील महिन्यात मतदान करून अध्यक्षांची निवड करणार आहेत.

संबंधित बातम्या