"भ्रमात राहू नका कोरोना संपलेला नाही" Who च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

लोकांनी भ्रमात न राहता अधिक काळजी घेतली पाहिज, लोक गाफील झाले आहेत मात्र कोरोना अजून संपलेला नाही असा इशाराच त्यांनी जगाला दिला आहे. (WHO)
"Don't be fooled, Corona isn't over," Who's Chief Scientist warns
"Don't be fooled, Corona isn't over," Who's Chief Scientist warnsTwitter

मागील दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाने(Covid19) जगात अक्षरश थैमान घातले आहे. जगासह भारतातही करोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. देशातील दुसरी लाट(Corona Second Wave) आता काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे अनेक दवे प्रतिदावे केले जात आहेत . अशातच आता करोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी जगाला नवीन इशारा दिला आहे.

लोकांनी भ्रमात न राहता अधिक काळजी घेतली पाहिज, लोक गाफील झाले आहेत मात्र कोरोना अजून संपलेला नाही असा इशाराच त्यांनी जगाला दिला आहे.

सद्यस्थिती पाहता कोरोना रुग्ण कमी होताच अनेक देशांनीनियम शिथिल केले आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे . आणि बऱ्याच देशांनी तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला आहे मात्र करोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं सौम्या स्वामिनाथन यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे अधिक काळजी घेणे गरजेचं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

फक्त आफ्रिकेचा विचार करता या देशात मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील २४ तासात पाच लाखाहून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली आहे तर तब्बल ९ हजार ३०० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही काही करोना आटोक्यात आल्याची चिन्हं नाहीत,तसेच जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढताना दिसतोय अस स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान करोनाचा डेल्टा व्हेरियंट अत्यंत घातक आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो.असेही सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com