सांस्कृतिक प्रतिनिधी मोक्षराज परतले भारतात

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

भारताचे अमेरिकेतील पहिले सांस्कृतिक राजनैतिक अधिकारी डॉ. मोक्षराज हे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने भारतात परतले आहेत.

वॉशिंग्टन: भारताचे अमेरिकेतील पहिले सांस्कृतिक राजनैतिक अधिकारी डॉ. मोक्षराज हे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने भारतात परतले आहेत. अमेरिकेत त्यांनी विविध संस्थांमध्ये संस्कृत आणि हिंदी भाषेचे अध्‍यापन केलेच शिवाय योग व ध्यानधारणेसह परंपरागत भारतीय संस्कृतीचा प्रसारही केला. कोरोनाकाळानंतर जगात पुन्हा एकदा ‘वसुधैव कुटुम्बकम’चा प्रतिध्वनी ऐकायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. योग, संस्कृत आणि हिंदी याचे शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या देशांत १६२ भारतीय नियुक्त केले आहेत. 

संबंधित बातम्या