‘ड्रॅगन’कडून सहा देशांची जमीन गिळंकृत

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

एकूण ४.११ लाख चौरस किलोमीटर भूभागावर ताबा
 

नवी दिल्ली

रशिया आणि कॅनडानंतरचा सर्वांत मोठा देश चीन आहे. त्याचे एकूण क्षेत्र ९७ लाख ६ हजार ९६१ चौरस किलोमीटरपर्यंत आहे. चीनची २२ हजार ११७ किलोमीटरची सीमा १४ देशांना भिडते. सर्वात जास्त देशांबरोबर सीमा असलेला चीन हा एकमेव देश आहे. विशेष म्हणजे या सर्व देशांबरोबर चीनचा सीमावाद सुरू आहे. प्रचंड भौगोलिक विस्तार असलेल्या चीनने सहा देशांच्या ४.११ लाख चौरस किलोमीटर जमिनीवर ताबा मिळविला आहे. भारताचाही ४३ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनने गिळकृंत केला आहे.

जमीन बळकावलेले देश
१) पूर्व तुर्कस्तान
- पूर्व तुर्कस्तानवर चीनचा १९४९ मध्ये ताबा.
- ताब्यातील प्रदेशाची ‘शिनजियांग’ प्रांत अशी ओळख.
- तिबेटप्रमाणे शिनजियांगलाही स्वायत्त क्षेत्राचा दर्जा.
- या प्रदेशातील ४५ टक्के जनता उइगर मुस्लिम व हान चिनींचे प्रमाण ४० टक्के.
- उईगर मुस्लिम मूळचे तुर्की मानले जातात.
-----
२) तिबेट
- चीनने २३ मे १९५०मध्ये तिबेटवर हल्ला करून ताबा मिळविला.
- पूर्व तुर्कस्ताननंतर तिबेट हा चीनचा दुसरा मोठा प्रांत.
- येथील ७८ टक्के जनता बौद्ध धर्मीय.
- चीनने १९५९मध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना अंगरक्षकांसह बीजिंगला येण्याचे निमंत्रण दिले होते.
- त्यानंतर दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला.
- भारत-पाकिस्तानमधील १९६२च्या युद्धामागे एक कारण दलाई लामांचे असल्याचे मानले जाते.

दक्षिण मंगोलिया किंवा इनर मंगोलिया
- दुसऱ्या महायुद्धानंतर चीनने इनर मंगोलियावर ताबा मिळविला.
- चीनकडून १९४९ मध्ये हा भाग स्वायत्त घोषित.
- भौगोलिकदृष्ट्या इनर मंगोलिया चीनचा सर्वांत मोठा उपविभाग आहे.

४) तैवान
- चीन व तैवानमध्ये अनोखे संबंध आहेत.
- चीनमध्ये १९११ मध्ये कॉमिंगतांग यांचे सरकार सत्तेवर आले होते.
- १९४९मधील यादवीत माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाकडून कॉमिंगतांग यांच्या पक्षाची हार.
- पराभवानंतर कॉमिंगतांग तैवानला गेले.
- १९४९ मध्ये चीनचे नामकरण ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ असे झाले तर तैवानची ओळख ‘रिपब्लिक ऑफ चायना’ अशी झाली.
- दोन्ही देशांची एकमेकांना मान्यता नाही.
- तैवान हा त्यांचाच भाग असल्याचा चीनचा दावा.

५) हाँगकाँग
- हाँगकाँग हा पूर्वी चीनचा हिस्सा होता.
- ब्रिटिशांबरोबर १८४२ मध्ये झालेल्या लढाईत चीनने तो गमावला.
- ब्रिटनने १९९७ मध्ये हाँगकाँगचा ताबा चीनला दिला.
- ताबा देताना ‘एक देश एक व्यवस्था’ करार झाला.
- करारानुसार हाँगकाँगला पुढील ५० वर्षे राजनैतिक पातळीवर स्वातंत्र्य देण्यास चीनची मान्यता.
- चिनी जनतेली नसलेले विशेष अधिकार हाँगकाँगच्या नागरिकांना बहाल.

६) मकाऊ
- मकाऊ ४५० वर्षे पोर्तुगिजांच्या ताब्यात होते.
- पोर्तुगालने डिसेंबर १९९९मध्ये मकाऊचा ताबा चीनकडे दिला.
- ताबा देताना हाँगकाँगप्रमाणे करार.
- करारानुसार मकाऊला ५० वर्षांपर्यंत राजनैतिक स्वातंत्र्य बहाल.

भारताच्या भूभागावरील दावा
- अरुणाचल प्रदेशच्या ९० हजार चौरस किमी परिसर.
- लडाखमधील ३८ हजार चौरस किमी भाग चीनच्या ताब्यात.
- चीन-पाकिस्तानमधील २ मार्च १९६३ मधील करारानुसार पाकव्याप्त काश्‍मीरचा पाच हजार १८० चौ. किमी प्रदेश चीनला मिळाला.
- चीनचा भारताच्या ४३ हजार १८० चौ. किमी भागावर ताबा.
- हा प्रदेश स्वित्झर्लंडपेक्षाही मोठा.
- स्वित्झर्लंडचा भौगोलिक प्रदेश ४१ हजार २८५ चौ. किमी आहे.

दक्षिण चीन सागरावरही दावा
- इंडोनेशिया आणि व्हिएतनामधील हा समुद्राची व्याप्ती ३५ लाख चौ. किमी.
- समुद्राच्या बाजूने इंडोनेशिया, व्हिएतनाम, चीन, फिलिपाईन्स, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेईच्या सीमा.
- इंडोनेशियासोडून अन्य देशांचा या समुद्रावर दावा.
- चीनकडून समुद्रात कृत्रिम बेट आणि सैन्याचा तळ उभारला.
- यावर आक्षेप घेतल्यानंतर दक्षिण चीन सागराशी दोन हजार वर्षांपासून संबंध असल्याचा चीनचा दावा.
- या सागरावर आधी जपानचा ताबा होता. पण दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच चीनने त्यावर आपला हक्क सांगितला.

 

संबंधित बातम्या