तानशाहाच्या मुलाचे राष्ट्रपती होण्याचे स्वप्न भंगले!

2011 च्या अरब स्प्रिंग दरम्यान मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली सैफ अल-इस्लामला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानेही वाँटेड घोषित केले आहे.
तानशाहाच्या मुलाचे राष्ट्रपती होण्याचे स्वप्न भंगले!
Seif al-Islam Gadhafi Dainik Gomantak

सैफ अल इस्लामला (Seif al-Islam Gadhafi) राजधानी त्रिपोली येथील न्यायालयाने 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. वडील गद्दाफी यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शनादरम्यान निदर्शकांवर हिंसाचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र, लिबियातील प्रतिस्पर्धी अधिकाऱ्यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 2011 च्या अरब स्प्रिंग दरम्यान मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली सैफ अल-इस्लामला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानेही वाँटेड घोषित केले आहे.

Seif al-Islam Gadhafi
भाकरीसाठी अफगाणी लोक विकतायेत मुली!
Summary

बियाच्या सर्वोच्च निवडणूक मंडळाने देशाचा हुकूमशहा मोअम्मर गद्दाफीचा (Moammar Gadhafi) मुलगा सैफ अल-इस्लाम गडाफी याला पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहण्यास अपात्र ठरवले आहे. एकेकाळी सैफ अल-इस्लामकडे मोअम्मर गद्दाफीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. देशाच्या उच्च राष्ट्रीय निवडणूक समितीने बुधवारी जाहीर केलेल्या अपात्र उमेदवारांच्या यादीत सैफ अल-इस्लाम गद्दाफीचे नावही समाविष्ट आहे. यामुळे ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत. त्याला समितीच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. या दोन्ही सरकारांमुळे देशात गृहयुद्धाची मालिका सुरूच आहे आणि या काळात प्रमुख व्यक्तींनाही जीव गमवावा लागला आहे.

लिबियाच्या माजी हुकूमशहाचा मुलगा सैफ याने 14 नोव्हेंबर रोजी सभा शहरात आपले उमेदवारी अर्ज सादर केले. 49 वर्षीय सैफ अल-इस्लाम अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics) मधून पीएचडी पदवी घेतलेल्या सैफ अल-इस्लामच्या संभाव्य उमेदवारीच्या घोषणेने देशभरात वादाला तोंड फुटले आहे. त्याला 2011 च्या उत्तरार्धात जिंतान शहरात सैनिकांनी पकडले आणि नंतर 2017 मध्ये सोडण्यात आले. अनेक उच्चपदस्थ उमेदवारांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com