चीनमध्ये पैशांचा पाऊस!; लाेकांची तुफान गर्दी आणि ट्रॅफिक जाम.....

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातून येत असलेल्या पैशांच्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कारण लोकं पैशे उचलण्यासाठी झगडताना दिसली.

बिजिंग- अंमली पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक वगैरे असते हे सर्वश्रूत आहे. मात्र, ते  खिशालाही घातक असते हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. काही दिवसांपूर्वीच चीनमधील बिजिंग शहरात एकाने या अंमली पदार्थांच्या नादात असे काही केले आहे की हे बघून तेथील पोलिसही संभ्रमात पडले.  

चीनमधील बो या 29 वर्षीय इसमाने मोठ्या प्रमाणात 'मेथ' नावाचे ड्रग्ज घेतल्यानंतर बाल्कनीतून चक्क पैसे उडवायला सुरुवात केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातून येत असलेल्या पैशांच्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कारण लोकं पैशे उचलण्यासाठी झगडताना दिसली. बो याच्या अजब कृत्याबद्दल या इसमाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अंमली पदार्थांचे सेवन करून गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम चीनमधील शॉपिंगबा येथे काही दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. चीनच्या ट्विटरसारख्या मायक्रोब्लॉगिंग सर्व्हिसवर चिनी पोलिसांनी याबद्दलची अधिक माहिती देताना सांगितले आहे की, दुपारी दीडच्या सुमारास शॉपिंगबा जिल्ह्यातील बो या 29 वर्षीय तरुणाने आपल्या घरात मेथड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं होतं. नंतर बोने नशेत आपल्या बाल्कनीतून पैसे फेकायला सुरुवात केली. जे पैसे रस्त्यावर पडू लागले, त्यामुळे बरेच जण गाडीतून उतरुन ते पैसे गोळा करू लागले. या प्रकरणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते.
बो आपल्या ३० व्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून पैसे फेकत होता. पैशाचा पाऊस पाहून काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, बोने आपल्या बाल्कनीतून किती पैसे फेकले हे प्रशासनाने अद्याप जाहीर केलेले नाही. बोने फेकलेले पैसे लोकं माघारी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या