प्यार किया तो डरना क्या? पाकिस्तानी डीएसपी ची आगळीवेगळी प्रेमकथा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये 55 वर्षीय डीएसपी साबिर चथाने 19 वर्षीय महिला हवालदार असलेल्या इकराशी लग्न केले आहे. इकरा ही सोहावाची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पाकिस्तान: असे म्हटलं जातं की कोण, कधी, कुठे, कसा आणि कुणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. प्रेम धर्म किंवा वय पाहत नाही त्याला दिसतं ते फक्त प्रेम आणि ती व्यक्ती. पाकिस्तानमध्येही प्रेमकथेचे असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याचे काही लोक कौतुक करीत आहेत तर काही लोक त्यावर टीका देखील करीत आहेत. कारण या प्रेमकथेत खूप मोठ अंतर आहे. आणि ही प्रेमकथा सर्वत्र चर्चेत आलेली आहे.

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये 55 वर्षीय डीएसपी साबिर चथाने 19 वर्षीय महिला हवालदार असलेल्या इकराशी लग्न केले आहे. इकरा ही सोहावाची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, या दोघांमधील वयातील इतके अंतर आहे की लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि म्हणूनच या लग्नाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अहवालानुसार इकरा पोलिस दलात सामील झाली, त्याच वेळी साबिर तीच्या प्रेमात पडला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि आता लग्नबंधनात अडकले आहेत. काही लोक या लग्नामुळे खूप आनंदात आहेत, तर काही लोक यावर टीका देखील करीत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारची प्रकरणे पाकिस्तानातच पाहिली जातात. काहीजण म्हणतात की यात काय चूक आहे? सध्या या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. पण लोगोसे क्या डरना, असे म्हणत या डीएसपी साबिर चथाने आणि पोलिस कॉस्टेबल इकराने आपल्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे सध्या त्यांची ही प्रेम कथा आणि जगावेगळ्या निर्णयाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे.

 

संबंधित बातम्या