बघा जगातली सगळ्यात महाग बिर्याणी कुठे मिळते; सजावट बघून थक्क व्हाल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

या जगात आपल्याला बिर्याणीचे चाहते असलेले बरेच लोक सापडतील. त्यांच्या समोर बिर्याणी ठेवली, तर ते ती काही क्षणांतच संपवतील. तसं तर आपण बिर्याणी खूप वेळा खाल्ली असेल, पण तुम्हाला जगतली सगळ्यात महागडी बिर्याणी कोणती, हे माहिती आहे का ?

दुबई : या जगात आपल्याला बिर्याणीचे चाहते असलेले बरेच लोक सापडतील. त्यांच्या समोर बिर्याणी ठेवली, तर ते ती काही क्षणांतच संपवतील. तसं तर आपण बिर्याणी खूप वेळा खाल्ली असेल, पण तुम्हाला जगतली सगळ्यात महागडी बिर्याणी कोणती, हे माहिती आहे का ? होय, जगातल्या सर्वात महागड्या बिर्याणीची किंमत 20 हजार रुपये असून, ही फक्त एक प्लेट बिर्याणी आहे. 

इमरान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्याची दिली परवानगी

इराणला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी मुत्सद्दीपणा हाच उत्तम मार्ग - परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन 

ही बिर्याणी दुबईतील एका रेस्टॉरंटने लॉन्च केली आहे. ही जगातील सर्वात महागडी बिर्याणी असल्याचे म्हटले जात आहे. दुबईतील बॉम्बे बरो नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ही बिर्याणी लॉन्च करण्यात आली आहे. या रेस्टॉरंटच्या मालकाने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मेन्यूमध्ये या खास डिशचा समावेश केला आहे. ही बिर्याणी एकावेळी सहा लोक खाऊ शकतात. ही रॉयल बिर्याणी असल्याचे म्हटले जात आहे, जी 23 कॅरेट सोन्याने सजविलेली असेल. 

या बिर्याणीत काश्मिरी मटन कबाब्स्, ओल्ड दिल्ली मटन चॉप्स, राजपूत चिकन कबाब्स्, मुघलाई कोफ्ते आणि मलाई चिकन यांचा समावेश आहे. आपण ऑर्डर केल्यावर आपल्याला 45 मिनिटांत हि बिर्याणी मिळेल. या बिर्याणीबरोबरच आपल्यला रायतं, कढीपत्ता आणि सॉसही देण्यात येईल. जर आपण दुबईत राहत असाल, तर या बिर्याणीचा आनंद घ्या, जर आपण दुबईत राहत नसाल, तर जर कधी दुबईला गेलात, तर या बिर्याणीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. 

संबंधित बातम्या