due to fire from heater 19 peoples killed
due to fire from heater 19 peoples killedDainik Gomantak

New York: हिटरमुळे लागलेल्या आगीत 19 जणांचा मृत्यू

न्युयॉर्कमध्ये (New York) भीषण अपघातात 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू झाला.

हिवाळ्यामधील (Winter) कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक हिटरचा वापर करतात. पण हिटरचा वापर करतांना काळजी घेण्याची गरज आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) हिटरमुळे भीषण अपघात झाला असून, यात 9 मुलांसह 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्पेस हिटरमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. अचानक ब्रॉन्क्स अपार्टमेंट इमारतीमध्ये धुराचे लोट पसरले. इलेक्ट्रिक स्पेस हिटरमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे अग्निशामक आयुक्त डॅनियल निग्रो यांनी माहिती दिली. 19 मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे लॉट पसरले आणि त्यात लोकांना जीव गमवावा लागला.

बचाव करण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या (Building) खिडक्या तोडल्या आहेत. अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या लोकांचा श्वास गुदमरला, खिडक्यांचा काचा फोडल्या आणि दारावर ओले टॉवेल टांगले. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानानी खूप प्रयत्न करून एका तरुणाला वाचवले. तो म्हणाला की मी इतका घाबरलो होतो की प्रत्येक वेळी फायर अलार्मएवजी खोटा अलार्म (Alarm) वाजवयाचा. निग्रो म्हणाले की, सर्व प्रयत्न करूनही काही लोकाना वाचवता आले नाही. यांचे कारण धूर खूप भरला होता. बचावकर्त्यांना प्रत्येक मजल्यावर बळी सापडेल. बहुतांश लोकांच्या श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम झाला होता.

 due to fire from heater 19 peoples killed
आशिया आणि आफ्रिकेनंतर श्रीलंका चीनच्या कर्जाच्या सापळ्यात!

* 13 लोकांची प्रकृती गंभीर

या घटनेमध्ये मृत झालेल्या मुलांचे व 16 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे. बहुतेक लोक झांबिया या आफ्रिकन राष्ट्राचे मूळ रहिवाशी असून ते, मुस्लिम समुदायाचे आहेत. अद्याप 13 जं गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेत एकूण 60 जण बाधित झाले आहेत. निग्रो म्हणाले की मृतांपैकी बहुतेकांना श्वासोच्छ्वास जाणवत होता. ते म्हणाले की ही घटना अतिशय भयावह आहे. मात्र, रविवारी लागलेली यंग आटोक्यात आणण्यासाठी 200 बचवकर्ते घटनास्थळी पोहोचले होतेआणि तातडीने कारवाई करून अधिकाअधीक लोकाना वाचवण्यात यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com