मतदानाच्या पार्श्‍वभूमीमुळे रशियात रुग्णांमध्ये भर

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

प्रवास परवाना रद्द झाल्यामुळे वावर वाढला

मॉस्को

 व्लादिमीर पुतीन आपला कार्यकाळ वाढविण्याचा कौल आजमावत असतानाच रशियातील कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. बुधवारी साडेसहा हजारपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली. देशातील एकूण रुग्णांची संख्या साडेसहा लाखाच्यावर गेली आहे.
रुग्णांच्या बाबतीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक आहे. पुतीन यांना 2036 पर्यंत अध्यक्षपदावर राहता यावे म्हणू घटनाबदल करण्यावर राष्ट्रीय पातळीवर मतदान होत आहे. प्रवासासाठी परवाना अनिवार्य असण्याची अट आठ जून रोजी मागे घेण्यात आली. याचे नागरिकांनी स्वागत केले असून अनेक जण बाहेर पडून रस्ते, पदपथ, पार्क अशा ठिकाणी एकत्र येण्याचा आनंद लुटत आहेत. इतर अनेक भागांतील लॉकडाउन उठविण्यात आले आहे.
रुग्णांच्या बाबतीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक आहे. पुतीन यांना 2036 पर्यंत अध्यक्षपदावर राहता यावे म्हणू घटनाबदल करण्यावर राष्ट्रीय पातळीवर मतदान होत आहे, पण बुधवारी उलटलेल्या 24 तासांत 216 रुग्णांचा मृत्यु झाला. ही संख्या 9536 इतकी झाली आहे. इतर काही देशांच्या तुलनेत हे प्रमाण मात्र कमी आहे. बरे झालेल्या रुग्णांची दिवसातील संख्या दहा हजार 281, तर एकूण चार लाख 22 हजार 931 इतकी आहे.
मृतांचे कमी प्रमाण संशयास्पद असून सरकार आकडेवारी दाबत आहे असा आरोप टीकाकारांनी केला आहे. सरकारने मात्र सामुहिक चाचण्यांमुळे विषाणू सौम्य असण्याचे किंवा लक्षणरहित रुग्ण मिळण्याचे कारण दिले आहे.
आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ठरविण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. दुसरा एखादा आजार असला किंवा रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आली तरी सर्व मृत्यु कोरोनाशी संबंधित असल्याचे मानून तशी मोजणी केली जात आहे.

संबंधित बातम्या