World Population 2022: येत्या आठवड्यात जगाची लोकसंख्या होणार 8 अब्ज, 1950 पासून किती वाढली?

Earth Population Hit 8 Billion Next Week: येत्या आठवड्यात जगाची लोकसंख्या 8 अब्जांपर्यंत पोहोचेल.
Population
PopulationDainik Gomantak

Earth Population Hit 8 Billion Next Week: येत्या आठवड्यात जगाची लोकसंख्या 8 अब्जांपर्यंत पोहोचेल. जी पुढील 8 वर्षांपर्यंत म्हणजेच 2030 पर्यंत 8.5 अब्जांपर्यंत पोहोचू शकते. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आकडेवारी आणि अभ्यासानुसार 2100 पर्यंत लोकसंख्या 10.4 अब्ज होईल असा अंदाज आहे.

दुसरीकडे, विल्सन सेंटर थिंक टँकच्या अलीकडील संशोधन आणि अभ्यासानंतरच्या अहवालानुसार, प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे 2022 ते 2050 या वर्षांमध्ये 61 देशांची लोकसंख्या 1% किंवा त्याहून अधिक कमी झाल्याचा अंदाज आहे.

Population
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड अडचणीत; युरोपियन युनियन मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत

दरम्यान, विल्सन सेंटर थिंक टँकच्या अलीकडील संशोधन आणि अभ्यासानंतरच्या अहवालानुसार, प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे 2022 ते 2050 या वर्षांमध्ये 61 देशांची लोकसंख्या 1% किंवा त्याहून अधिक कमी झाल्याचा अंदाज आहे.

त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांनी (UN) जारी केलेल्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, पुढील आठवड्यात जगाची लोकसंख्या आठ अब्जांवर पोहोचेल. येत्या काही दशकांत लोकसंख्या (Population) वाढतच जाणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने म्हटले आहे. त्याच वेळी, आयुर्मान 2050 पर्यंत सरासरी 77.2 वर्षे वाढेल.

Population
युरोपियन युनियनने रशियासाठी आखली तेल बंदीची योजना

तसेच, ग्लोबल फूटप्रिंट नेटवर्क आणि WWF च्या आकडेवारीनुसार, जर संपूर्ण जगातील लोकांनी अमेरिकेतील कोणत्याही रहिवाशाप्रमाणे जगात असलेली संसाधने वापरली तर आपल्याला एका वर्षात पाच पृथ्वीएवढी संसाधने लागतील. युनायटेड नेशन्स (UN) च्या अंदाजानुसार 2050 पर्यंत पृथ्वी 9.7 अब्ज लोकांचे घर असेल. लोकसंख्येची चर्चा करताना उद्भवणाऱ्या सर्वात कठीण प्रश्नांपैकी एक म्हणजे प्रजनन क्षमता नियंत्रित करणे. त्यावर नियंत्रण ठेवण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.

दुसरीकडे, पॉप्युलेशन मॅटर्स या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक रॉबिन मेनार्ड यांच्या मते, सध्या लोकसंख्येचा दर कमी करण्याची गरज आहे. त्याच वेळी, एनजीओ प्रोजेक्ट ड्रॉडाउन म्हणते की, पृथ्वीवरील संसाधने दीर्घकाळ वाचवण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण आणि कुटुंब नियोजन यासारख्या गोष्टी त्याच्या अनेक मानकांची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Population
युक्रेन युद्धादरम्यान 8 युरोपियन नेते भारतात पंतप्रधान मोदींच्या भेटीला

युरोपबद्दल बोलायचे झाल्यास, 2021 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी युरोपियन युनियन (EU) ची लोकसंख्या कमी झाली आहे. युरोपियन युनियनच्या सांख्यिकी विभागाने आपल्या निवेदनात म्हटले की, युरोपमध्ये कोरोना विषाणूमुळे 20 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे ही कपात झाली आहे. त्याच वेळी, युरोस्टॅटनुसार, युरोपमधील (Europe) 27 देशांच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे.

एका अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत युरोपियन युनियनची एकूण लोकसंख्या घटेल किंवा वाढेल, त्यात सर्वात मोठा वाटा त्या स्थलांतरितांचा असेल ज्यांनी चांगल्या आयुर्मानाच्या आशेने आपला देश सोडला. एका अंदाजानुसार, 1950 ते आता 2022 पर्यंत जगाची लोकसंख्या जवळपास तिप्पट वाढली आहे.

Population
युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळ मोहिमेतून रशियाला काढले बाहेर

शिवाय, अनेक आव्हाने असूनही, EU सदस्य देशांपैकी अर्ध्याहून अधिक देशांनी त्यांची लोकसंख्या वाढलेली पाहिली आहे (According To Eurostat Data). त्यात फ्रान्स आघाडीवर, दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड्स आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वीडनची लोकसंख्या वाढली. यानंतर इटली, पोलंड आणि रोमानियाने युरोपियन युनियनमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या आकड्यांना स्पर्श केला. युरोस्टॅटने जानेवारी 2022 पर्यंत युरोपियन युनियनमध्ये राहणाऱ्या सुमारे 44 दशलक्ष लोकांची गणना केल्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com