Earthquake In Taiwan: 24 तासांत Taiwan पुन्हा हादरले, भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला

Earthquake in Taiwan Again: चीनसोबत दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात तैवानसाठी शनिवार आणि रविवार खूप तणावात गेला.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

Earthquake in Taiwan Again: चीनसोबत दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात तैवानसाठी शनिवार आणि रविवार हे दिवस खूप तणावात गेले. शनिवारनंतर रविवारी दुपारीही येथे भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. वास्तविक, 24 तासांत हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी शनिवारी तैवानमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

शनिवारी रात्री 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला

शनिवारी रात्री तैवानच्या पूर्व किनारपट्टी भागात 6.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही ही दिलासा देणारी बाब आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, उत्तरेकडील तटीय शहर तैतुंगपासून सुमारे 50 किमी अंतरावर रात्री 9:30 वाजता भूकंप (Earthquake) झाला. त्याचे केंद्र 10 किमी खोलीवर होते. भूकंपाची माहिती मिळताच बचावपथक मदतकार्यात गुंतले आहे. तैवानसाठी (Taiwan) भूकंप ही नवीन गोष्ट नाही. इथे अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात. वास्तविक, तैवान दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर वसले आहे.

Earthquake
China-Taiwan Tension: तैवानने भारताचे मानले आभार, 'आता ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर देऊ'

लोक तणावात आहेत, मात्र अद्याप त्सुनामीचा धोका नाही

सलग दोन भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक तणावात आहेत. त्यांना त्सुनामीचीही भीती वाटत आहे. भूकंपाची तीव्रता 7.0 मॅग्निच्युड होईपर्यंत तैवानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी केला जात नाही. 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळेही मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो, मात्र हे भूकंपाचे स्थान आणि खोली यावर अवलंबून असते. यूएस जिओलॉजिकल सर्वेक्षणाने देखील पुष्टी केली आहे की, अशा भूकंपामुळे तैवानमध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. मात्र किरकोळ नुकसान होऊ शकते. भूकंपांच्या बाबतीत, मोठ्या प्रमाणात, तीच परिस्थिती जपानमध्ये (Japan) राहते. भूकंपाचे धक्केही वारंवार जाणवत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com