''या'' देशात आली इबोलाची महामारी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

गिनीमध्ये तब्बल पाच वर्षानंतर इबोला विषाणूचा फैलाव वाढत आहे.

कोनाक्री: जगभरात कोरोनाचे सावट असताना आफ्रिमेधील गिनी या देशातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गिनीमध्ये तब्बल पाच वर्षानंतर इबोला विषाणूचा फैलाव वाढत आहे. आत्तापर्यंत इबोला या विषाणूमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. गिनी या देशाने इबोला विषाणूच्य़ा संसर्गाला महामारी घोषित केलं. गिनीमधील गोउइकेतील एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर सात लोकांना उलट्या, रक्तस्राव, डायरिया  होण्याचा त्रास जाणवू लागाला आहे. त्यामुळे त्वरित गोउइके लाइबेरिया सीमा भागातील लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे.

गिनीतील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्य़ा माहितीनुसार इबोलाचा संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच लगेच या विषाणू संसर्गाला आरोग्य मंत्रालयाने महामारी घोषित केलं आहे. ''आतंरराष्ट्रीय स्तरावर महामारीला रोखण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते सगळे प्रयत्न गिनी सरकार करता आहे.'' असे गिनीचे आरोग्यमंत्री रेमी लामाह यांनी म्हटले. तसेच इबोलामुळे चार व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे चिंताही व्यक्त केली आहे.

कोरोनाचा धोका टळलेला नाही; चौथी लाट येणार?

यापूर्वी  गिनी  देशात 2013-16 दरम्यान इबोलाचा मोठ्याप्रमामात प्रसार झाला होता. या इबोला विषाणूमुळे आत्तापर्यंत आफ्रिकामध्ये 11 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यापैकी इबोलामुळे सर्वाधिक मृत्यू गिनी, रियरा, लाइबेरिया या देशांमध्ये झाले आहेत. इबोला झाला असण्याची शक्यता असणाऱ्याची दोन ते तीन वेळा चाचणी करण्यात आली आहे. तसेच त्य़ांच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आहे.

गिनीबरोबर शेजारील कांगो देशात इबोला पिडीतांचा आकडा वाढत आहे. मागच्य़ा सात दिवसांपासून इबोलाचा संसर्ग वाढत आसल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. कांगोचे आरोग्यमंत्री यांनी सात फेब्रुवारीला इबोलाचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती दिली होती. कांगोच्या इक्वाटोर प्रातांत 2018 मध्ये इबोलाचा प्रसार मोठ्याप्रमाणात वाढला होता. कांगो सरकारने इबोला संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज केली आहे.  
 

संबंधित बातम्या