सोमालियात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

सोमालियामध्ये एका कंपनीने ३३ भारतीय कामगारांना गेल्या आठ महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा आरोप आहे. हे सर्व कामगार दहा महिन्यांपूर्वीच संबंधित कंपनीमध्ये नोकरीस लागले होते.

नवी दिल्ली- सोमालियामध्ये अडकून पडलेल्या ३३ भारतीयांच्या सुटका करून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

सोमालियामधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी सोमालिया सरकारशी याबाबत बोलणी करत असल्याचे ते म्हणाले. सोमालियामध्ये एका कंपनीने ३३ भारतीय कामगारांना गेल्या आठ महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा आरोप आहे. हे सर्व कामगार दहा महिन्यांपूर्वीच संबंधित कंपनीमध्ये नोकरीस लागले होते. पहिले दोन महिने चांगली वागणूक मिळाल्यानंतर मात्र कंपनीने गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना वेतन दिलेले नाही. 
 

संबंधित बातम्या