Shooting In US: शिकागोमधील गोळीबारात आठ जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

अमेरिकेतील (America) शिकागोमध्ये आठवड्याच्या शेवटी गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Shooting In US: शिकागोमधील गोळीबारात आठ जणांचा मृत्यू, 16 जण जखमी
ChicagoDainik Gomantak

अमेरिकेतील शिकागोमध्ये आठवड्याच्या शेवटी गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये किमान आठ जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला आहे, तर 16 जण जखमी झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

Chicago
रशियाचे अध्यक्ष 'पुतिन यांना कर्करोग', या मित्राकडे सोपवणार 'सत्ता' : रिपोर्ट

स्थानिक प्रसारक एनबीसी शिकागोने शहर पोलिसांचा हवाला देत वृत्त दिले की, शुक्रवारी संध्याकाळी 5.45 वाजता गोळीबार सुरु झाला. दक्षिण किलपॅट्रिकमध्ये एका 69 वर्षीय व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबाराच्या घटनांमध्ये एक अल्पवयीन तसेच 62 वर्षीय महिलेसह (Women) सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

दरम्यान, ब्राइटन पार्क, साउथ इंडियाना, नॉर्थ केडजी एव्हेन्यू, हम्बोल्ट पार्क यासह अनेक भागात गोळीबाराच्या घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसर्‍या मीडिया आउटलेटने सांगितले की, आठवड्याच्या शेवटी किमान आठ लोक मरण पावले. बंदूक हिंसा ही अमेरिकेची सर्वात मोठी समस्या आहे. देशाच्या विविध भागात गोळीबाराच्या घटना नेहमीच घडत असतात. याशिवाय गोळीबाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. गन वायलेन्स आर्काइव्ह या संशोधन गटानुसार, 2022 मध्ये यूएसमध्ये आतापर्यंत 140 हून अधिक सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 7500 स्त्रोतांकडून डेटा गोळा करण्यात आला आहे.

यापूर्वीही गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या

यापूर्वी, 30 एप्रिल रोजी अमेरिकेतील (America) मिसिसिपीमध्ये एका उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. हिंड्स काउंटी शेरिफ टायरी जोन्स यांनी सोशल मीडियावरुन सांगितले होते की, 'शनिवारी रात्री अनेकांना रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागले. याचदरम्यान एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.' जोन्स यांनी पुढे सांगितले की, 'ही घटना मिसिसिपीमध्ये घडली, जिथे एक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच न्यूयॉर्कमध्ये (New York) मेट्रो रेल्वेच्या भुयारी मार्गात भीषण गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 16 जण जखमी झाले आहेत. 30 तासांच्या प्रदीर्घ कारवाईनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.