अमेरिकेत स्पा मध्ये झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

अमेरिकेच्या अटलांटा शहरातील दोन मसाज पार्लर आणि उपनगरातील मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत.

अमेरिकेच्या अटलांटा शहरातील दोन मसाज पार्लर आणि उपनगरातील मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक आशियाई महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर दक्षिण पश्चिम जॉर्जिया मधून 21 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अटलांटाचे पोलिस प्रमुख रॉडनी ब्रायंट यांनी, ईशान्य अटलांटा येथील स्पामध्ये तीन महिलांचा मृत्यू तर दुसर्‍या एका स्पामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. आणि या चारही महिला आशियाई असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. 

किम जोंग यांच्या बहिणीची अमोरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना धमकी

अटलांटा पोलिस अधिकाऱ्यांना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी एका स्पा मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. आणि अधिकारी पहिल्या स्पा मध्ये पोहचताच अजून एका स्पा मध्ये गोळीबार झाल्याचे त्यांना समजले. यावेळेस पहिल्या स्पा मध्ये तीन महिलांवर गोळीबार झाल्याचे निदर्शनास आले. तर दुसऱ्या स्पा मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थनिक अधिकाऱ्यांकडून मिळाली. सायंकाळी पाचच्या सुमारास अटलांटापासून उत्तरेस 50 कि.मी. अंतरावर असलेल्या एकवर्थ शहरातील 'यंग्स एशियन मसाज पार्लर' मध्ये पाच जणांवर गोळीबार झाल्याचे समजते. यातील दोघा जणांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. आणि तीन जणांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु यातील दोन जनांनी आपला जीव हॉस्पिटल मध्ये सोडल्याचे स्थानिक अधिकारी कॅप्टन जे. बेकर यांनी सांगितले. 

व्हॅटिकन सिटीचा नवा आदेश; समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देता येणार नाही

तसेच, गोळीबाराच्या पूर्वी एकवर्थ शूटआऊटमधील संशयिताला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले गेले असल्याचे कॅप्टन जे. बेकर यांनी नमूद केले. व त्यानंतर वुडस्टॉक येथील रहिवासी रॉबर्ट आरोन लॉंगला ताब्यात घेतल्याची माहिती बेकर यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त, अटलांटाच्या गोळीबारात देखील लाँगचा समावेश असल्याचा संशय कॅप्टन जे. बेकर यांनी व्यक्त केला.    

 

संबंधित बातम्या