Elon Musk: एलन मस्कच्या नावावर अनोखा विक्रम, 200 अब्ज डॉलर गमावणारा...

Tesla: ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एवढी मोठी रक्कम गमावणारा ते इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

Elon Musk: ट्विटरचे नवे बॉस एलन मस्क यांचे सुमारे $200 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एवढी मोठी रक्कम गमावणारा ते इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. जेफ बेझोस नंतर $200 अब्ज पेक्षा जास्त वैयक्तिक संपत्तीपर्यंत पोहोचणारे मस्क हे दुसरे व्यक्ती होते. विशेष म्हणजे, जानेवारी 2021 मध्ये मस्क अब्जाधीशांमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले. मस्क यांच्या संपत्तीत घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली घसरण.

नोव्हेंबर 2021 मध्ये मस्कचा स्टॉक शीर्षस्थानी होता

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये मस्क यांचा स्टॉक 340 अब्जांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्यानंतर 200 अब्ज डॉलर्सची कमाई करणारे मस्क जगातील दुसरे व्यक्ती ठरले होते. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मस्क अव्वल स्थानावर आहेत, परंतु त्यानंतर LVMH चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी त्यांना मागे टाकले आहे. मस्क यांची एकूण संपत्ती पूर्वी $338 अब्ज होती. टेस्ला (Tesla) शेअर्समध्ये ही घसरण मस्क यांनी ट्विटर $44 बिलियनमध्ये विकत घेतल्यानंतर आली आहे.

Elon Musk
Elon Musk: ट्विटरने गिळंकृत केली मस्क यांची संपत्ती; टेस्लाचे शेअर्स विकावे लागल्याने संपत्तीत वर्षात 'इतकी' घट

मस्क नवीन सीईओ शोधत आहेत

मस्क यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्विटरचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यांनी सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ सेहगल आणि पॉलिसी हेड विजया गड्डे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले. यानंतर मस्क यांनी आपल्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले. दुसरीकडे, मस्क टेस्ला आणि ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होणार आहेत. म्हणूनच एलन मस्क अजूनही नवीन ट्विटर (Twitter) सीईओच्या शोधात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com